महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेड जिल्ह्यात सर्वदूर पाऊस, बळीराजा सुखावला

शहराच्या अनेक भागाात नालेसफाई योग्य झाली नसल्याने नाल्या तुंबून पावसाचे पाणी रस्यावर साचले आहे. त्यामुळे नागरिकांना चांगलाच मन:स्ताप सहन करावा लागत आहे. जुन महिन्यात पावसाने जिल्ह्याकडे पाठ फिरविल्याने शेतकरी वर्ग काहीसा चिंतातूर झाला आहे. परंतु या महिन्याच्या सुरुवातीपासून वरुण राजाने जिल्ह्यावर कृपादृष्टी केल्याने शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण आहे. जिल्ह्यात पेरण्या झाल्या असून अधून-मधून पडणाऱ्या पावसाने पिकेही जोमात वाढू लागली आहेत.

नांदेड जिल्ह्यात सर्वदूर पाऊस
नांदेड जिल्ह्यात सर्वदूर पाऊस

By

Published : Jul 7, 2022, 4:38 PM IST

Updated : Jul 7, 2022, 7:39 PM IST

नांदेड -जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ११.५० मिमी पावसाची नोंद करण्यात आली. यावर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडत असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. जिल्ह्यात वार्षिक सरासरी ९५०.५५ मिमी आहे. यावर्षी आतापर्यत जिल्ह्यात आतापर्यत जिल्ह्यात २४३.४० मिमी पावसाची नोंद करण्यात आली.

नांदेड जिल्ह्यात सर्वदूर पाऊस

जिल्ह्यात पावसाची सर्वदूर हजेरी - मागील २४ तासात जिल्ह्यातील सोळाही तालुक्यात पावसाने हजेरी लावली. धर्माबाद येथे सर्वाधिक २७.४० मिमी पावसाची नोंद करण्यात आली. त्यापाठोपाठ अर्धापूर येथे २२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. नायगाव येथे २०.३० मिमी तर नांदेड येथे १६.४० मिमी पावसाची नोद करण्यात आली. नांदेड शहरात गेल्या चार दिवसापासून अधून मधून पावसाच्या सरी कोसळत असल्याने सर्वत्र पावसाळी वातावरण आहे. शहराच्या अनेक भागाात नालेसफाई योग्य झाली नसल्याने नाल्या तुंबून पावसाचे पाणी रस्यावर साचले आहे. त्यामुळे नागरिकांना चांगलाच मन:स्ताप सहन करावा लागत आहे. जुन महिन्यात पावसाने जिल्ह्याकडे पाठ फिरविल्याने शेतकरी वर्ग काहीसा चिंतातूर झाला आहे. परंतु या महिन्याच्या सुरुवातीपासून वरुण राजाने जिल्ह्यावर कृपादृष्टी केल्याने शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण आहे. जिल्ह्यात पेरण्या झाल्या असून अधून-मधून पडणाऱ्या पावसाने पिकेही जोमात वाढू लागली आहेत.

Last Updated : Jul 7, 2022, 7:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details