नांदेडतेलंगणा सीमेवरील भोकर तालुक्यातील पाळज हे गाव, मातृभाषा तेलगु असूनही येथील चालीरीती व अधिक व्यवहार मात्र तेलंगणाशी असतो. रूढी परंपरा दाक्षिणात्य संस्कृतीशी जुळणाऱ्या असल्या तरी गावकरी मात्र मराठमोळं सण मोठ्या भक्तिभावाने जपतात. हा सण म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव, खरं तर पाळज फेस्टिव्हल म्हणायला हवे. गणेश म्हणजे गावाचं वैभव, आराध्य दैवत तर तेलंगणातील भक्ताचा कंठमणीच आहे. Palaj Ganpati Temple nanded पाजळ गावातील या मंदिरात दरवर्षी 11 दिवसाच्या गणेशोत्सवात 4 ते 5 लाख भाविक दर्शन घेतात. हे 11 दिवस म्हणजे ग्रामस्थांची दिवाळी व दसराच असतो.
किनी पाळजची १९४८ ला राखरांगोळी ग्रामप्रमुखाच्या स्वप्नात श्रीगणेशाने दर्शन दिल्याची आख्यायिका मराठवाडा मुक्तीसंग्रामच्या इतिहासाच्या पानावर किनी व पाळज या गावाचे नावे तेवढेच महत्त्वाचे आहे. यावेळी या दोन्ही गावातील अनेकांनी हौतात्म्य पत्करले. कित्येकांनी घरावर तुळशीपत्र ठेवून अस्मानी संकटाचा मुकाबला केला. Palaj Ganapati Festival 2022 वैभवसंपन्न किनी पाळजची १९४८ ला राखरांगोळी झाली. या दरम्यान ग्रामस्थांना श्रीगणेशाची मूर्ती स्थापना करण्याची निकड भासू लागली. निजामाच्या जुलमी राजवटीत हे मोठे आव्हानात्मक काम होते. यावेळी महामारी असताना एका रात्री संटी भोजन्ना या ग्रामप्रमुखाच्या स्वप्नात विघ्नहर्ता श्रीगणेशाने दर्शन देऊन संकट निवारणार्थ प्रेरणा दिली आणि श्रींच्या प्रतिमेची स्थापना करून तिचे विसर्जन न करण्यास सांगितले.