महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेडमध्ये गोवर्धन घाट परिसरात तरुणावर चाकू हल्ला - गोवर्धन घाट

या घटनेबाबत अजय जाधव याने दिलेल्या फिर्यादीवर वजिराबाद पोलीस ठाण्यात भादंवी कलम २४३/२०१९ कलम ३२६,३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक आगलावे करत आहेत.

नांदेडमध्ये गोवर्धन घाट परिसरात तरुणावर चाकू हल्ला

By

Published : Aug 14, 2019, 2:22 PM IST

देड -कैकाड गल्लीतील अजय राम जाधव (वय २५) या युवकावर याच भागातील काही जणांनी पूर्ववैमनस्यातून चाकू हल्ला केल्याची घटना घडली. मितीन माने, कृष्णा माने आणि कैलास माने, अशी हल्लेखोरांची नावे आहेत. मंगळवा दिलीपसिंग कॉलनीत रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास साजणे रुग्णालयासमोर ही घटना घडली. या हल्ल्यात अजयच्या कपाळावर गंभीर दुखापत झाली आहे.

नांदेडमध्ये गोवर्धन घाट परिसरात तरुणावर चाकू हल्ला

अजयला लाकडानेही जबर मारहाण करण्यात आली आहे. त्याच्या छाती आणि उजवा हातावर जबर मार लागलेला आहे. तसेच त्याला धमकीही देण्यात आली आहे. तसेच भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या हिरा जाधव यांच्याही डोक्यावर चाकूहल्ला करण्यात आला आहे.

या घटनेबाबत अजय जाधव याने दिलेल्या फिर्यादीवर वजिराबाद पोलीस ठाण्यात भादंवी कलम २४३/२०१९ कलम ३२६,३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक आगलावे करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details