नांदेड -'ओरल मेडिसिन व डेंटल रिसर्च' या जर्नलमध्ये एक संशोधन प्रकाशित झाले आहे. या संशोधनानुसार दंत व तोंडाच्या स्वच्छतेची सवय कोरोना विषाणूचा तोंडापासून फुफ्फुसापर्यंतचा प्रसार रोखू शकतो व कोरोना आजाराची तीव्रता कमी करू शकतो, असे सांगण्यात आले आहे. तसेच सर्वसाधारणपणे औषध दुकानांमध्ये उपलब्ध असलेल्या माउथवॉशमध्ये असलेले घटक क्लोरहेक्झिडीन हे कोरोना विषाणूला निष्क्रिय करण्यात अत्यंत प्रभावी असल्याचेही त्यात म्हटले आहे.
हिरड्यांचा आजार असलेल्या रुग्णांना कोरोनाचा संभाव्य धोका -
संशोधनात असेही आढळून आले आहे की, कोरोना विषाणू हा हिरड्यांचा आजार असलेल्या रुग्णांच्या लाळेतून प्रत्यक्षपणे हिरड्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये प्रवेश करतो व रक्ताच्या माध्यमातून फुफ्फुसांमध्ये सहजपणे प्रवेश करतो. हिरड्यांचा आजार असलेल्या रुग्णांच्या लाळेमध्ये विषाणूचे प्रमाण जास्त असल्यामुळे तिथून फुफ्फुसांच्या रक्तवाहिन्यांना होणारा कोरोनाचा संसर्ग हा श्वसनमार्गातून होणाऱ्या संसर्गापेक्षा जीवघेणा आहे. संशोधन हे ही सांगते की, दातांवर जमलेला मळ (Plaque) आणि हिरड्यांवरील सूज या दोन गोष्टी कोरोना विषाणूला लवकर फुफ्फुसांपर्यंत पोहोचवतो व फुफ्फुसांमधील संसर्ग वाढवतो.
नियमित दंत व तोंडाची स्वच्छता आवश्यक -