नांदेड - भारतीय संविधानास ७० वर्षे पूर्ण झाल्याच्या अनुषंगाने काल मंगळवारी नोव्हेंबर रोजी संपूर्ण भारतीय रेल्वेमध्ये संविधान दिवस पाळण्यात आला. या वर्षभरात २६ नोव्हेंबर २०१९ ते २६ नोव्हेंबर २०२० दरम्यान विविध कार्यक्रम साजरे करण्यात येणार आहेत.
देशभरात काल 'संविधान दिवस' साजरा करण्यात आला. या दिवशी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला राज्यघटना प्रदान केली होती. या दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आजोयन करण्यात आले होते. रेल्वे विभागातही हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय संविधानास ७० वर्षे पूर्ण झाल्याच्या अनुषंगाने देशभरात २६ नोव्हेंबर २०१९ ते २६ नोव्हेंबर २०२० दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहेत.