महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेड जिल्ह्यात ३ लाख ६१ हजार ५७७ हेक्टर शेतीचे नुकसान, ओल्या दुष्काळाबाबत निर्णय घ्यावा लागणार -चव्हाण - agricultural damage

नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने नदी-नाल्यांना पुर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर नदी काठच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. लोकांना सुरक्षास्थळी हलवणे हे प्रशासनाचे पहिले कर्तव्य आहे, त्या दृष्टीने मदतकेंद्रांमध्ये नागरीकांचे स्थलांतर करुन, त्यांना भोजनाची देखील व्यवस्था करण्यात आली. सध्या जिल्ह्यात ३ लाख ६१ हजार ५७७ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबतचा अंतिम निर्णय शासनस्तरावर होईल, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

पालकमंंत्री अशोक चव्हाण
पालकमंंत्री अशोक चव्हाण

By

Published : Sep 10, 2021, 4:55 AM IST

Updated : Sep 10, 2021, 9:29 AM IST

नांदेड - जिल्ह्यात गेल्या १५ वर्षानंतर प्रचंड पाऊस झाला आहे. नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. काही वस्त्यांमध्ये पाणी शिरले. त्याची आज सकाळीच पाहणी करण्यात आली. लोकांना सुरक्षास्थळी हलविणे हे प्रशासनाचे पहिले कर्तव्य आहे, त्या दृष्टीने मदतकेंद्रांमध्ये नागरीकांचे स्थलांतर करुन त्यांना भोजनाची देखील व्यवस्था करण्यात आली. पावसामुळे जिल्ह्यातील रस्त्यांचेही मोठे नुकसान झाले. तर, काहीजण पुरात वाहून गेले आहेत. जनावरेही वाहून गेली आहेत. जिल्ह्यात ३ लाख ६१ हजार ५७७ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबतचा अंतिम निर्णय शासनस्तरावर होईल, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

माहिती देताना पालकमंत्री अशोक चव्हाण

'आतापर्यंत ५ व्यक्ती वीज पडून तर पुरात वाहून २४ व्यक्तींचा मृत्यू'

शहरातील पंचशिलनगर, दुलेशहानगर, गाडीपुरा या बाधित घरांचे प्रचंड नुकसान झाले. पावसाने उग्ररूप धारण केल्याने शेतीचे रूपांतर शेततळ्यात झाले. परिणामी शेतकऱ्यांनी मागील चार महिन्यांपासून जोपासलेल्या पिकाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. त्यात सोयाबीन, हळद, कापूस, ऊस या पिकाची नुकसान होऊन आर्थिक हानी झाली. त्यामुळे शेतकरी अतिवृष्टीमुळे एकुण ४ व्यक्ती पुरात वाहून मयत झाले आहेत. यामध्ये मुखेड तालुक्यातील ३ तर हदगाव तालुक्यातील १ व्यक्तीचा समावेश आहे. जुनपासून ते आतापर्यंत ५ व्यक्ती वीज पडून तर पुरातवाहून २४ व्यक्ती मयत झालेले आहेत.

'ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या बाबतीत शासनस्तरावर निर्णय होईल'

पशूधनामध्ये मोठे जनावरे ८७ तर लहान जनावरे २६ पुरात वाहून गेले. गेल्या चार दिवसांतील अतिवृष्टीमुळे कंधार तालुक्यात १ म्हैस, लोहा तालुक्यात १ गाय, बिलोली तालुक्यात १ गाय व वासरू, हिमायतनगर तालुक्यात २ बैल असे ५ जनावरे वाहून गेले आहेत. मागील दोन दिवसात ५ व्यक्तींना पुरातून सुखरूप बाहेर काढण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले. यात नायगाव तालुक्यातील कुंटूर येथील १ व्यक्ती व मुखेड तालुक्यातील ४ व्यक्तींचा समावेश आहे. जिल्ह्यात शेतीचे जवळपास ५० टक्के नुकसान झाले असून, ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या बाबतीत शासनस्तरावर निर्णय होईल, असेही चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

'शेतकऱ्यांना नुकसानीच्या २५ टक्क्यांपर्यंत तात्पुरत्या स्वरुपाची मदत वितरण करण्याबाबत कारवाई'

नुकसानीच्या पंचनाम्याचे काम सुरु सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत नुकसानीच्या आढाव्यासाठी जिल्हा प्रशासनाला निर्देश देण्यात आलेले आहेत. पंचनाम्याचे काम सुरु आहे. यावर्षी जुलै महिण्यात काही भागामध्ये अतिवृष्टी झाली आहे. यात १ लाख ३८ हजार खातेदारांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. विमाधारक शेतकऱ्यांना वीमारक्कम अदा करण्याबाबत वीमा कंपन्यांना निर्देश देवून प्रक्रिया सुरु केली आहे. सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर या पिकांचा विमा काढलेल्या शेतकऱ्यांना नुकसानीच्या २५ टक्क्यांपर्यंत तात्पुरत्या स्वरुपाची मदत वितरण करण्याबाबत कारवाई केली जात आहे, असंही ते म्हणाले आहेत.

Last Updated : Sep 10, 2021, 9:29 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details