नांदेड - देगलूर शहरातून तालुक्यातील ग्रामीण भागाला जोडणारे अनेक रस्त्यांची पहिल्याच पावसात दुर्दशा झाली आहे. संपूर्ण रस्ता चिखलमय झाला आहे. यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन रस्ते दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
महाराष्ट्र, तेंलगणा व कर्नाटकाच्या सीमेवरील असलेल्या देगलूर तालुक्यातील अनेक गावांचा रस्त्यांची पहिल्याच पावसात दुर्दशा झाली आहे. तालुक्याला जोडणाऱ्या तमलूर, हिप्परगा, नरंगल, सुंडगी या गावजवळील रस्त्यावर पावसामुळे मोठे खड्डे पडले आहेत. या मार्गावरील अपघाताचे प्रमाण वाढले असून या गावांचे रस्ते जीवघेणे झाले आहेत.