महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाराष्ट्र सरकार सुविधा देत नसेल तर टीआरएसच्या तिकिटावर निवडणूक लढवू

तेलंगाणा राज्यात येथील गावे विलीन करण्याच्या चळवळीचे नेतृत्व करणारे बाभळीचे सरपंच बाबूराव गणपतराव कदम यांच्या नेतृत्वात या सीमेवरील गावातील नागरिकांनी मुख्यमंत्री चंद्रशेखर यांच्याकडे आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यावेळी मुख्यमंत्री के.चंद्रशेखरराव यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.

मुख्यमंत्री के.चंद्रशेखरराव

By

Published : Sep 17, 2019, 11:28 PM IST

Updated : Sep 18, 2019, 6:58 PM IST

नांदेड- महाराष्ट्र राज्य सरकार सुविधा पुरवीत नसेल तर आम्ही आमची गावे तेलंगाणा राज्यात विलीन करणार आहोत. त्यासाठी आम्ही आंदोलन करू. आगामी विधानसभा निवडणुका लढवू. मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी आम्हाला संधी दिली तर, आम्ही टीआरएसच्या तिकिटांवर निवडणूक लढवू, असे नांदेड जिल्ह्याच्या सीमेवरील काही नेत्यांनी जाहीर करुन रणशिंग फुंकले आहे.

टीआरएसच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची तयारी

हेही वाचा-नांदेडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून 24 लाखांना गंडविले, आरोपी जेरबंद

तेलंगणाच्या सीमेवरील नांदेड जिल्ह्यातील नायगाव, भोकर, देगलूर, किनवट आणि हदगाव विधानसभा क्षेत्रातील काही ग्रामस्थांनी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी तेलंगणा राज्यात येथील गावे विलीन करण्याच्या चळवळीचे नेतृत्व करणारे बाभळीचे सरपंच बाबूराव गणपतराव कदम यांच्या नेतृत्वात या सीमेवरील गावातील नागरिकांनी मुख्यमंत्री चंद्रशेखर यांच्याकडे आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यावेळी मुख्यमंत्री के.चंद्रशेखरराव यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. यावेळी टीआरएस पक्षाच्या तिकिटावर जागा मिळाल्यास आम्ही लढण्यास तयार असल्याचेही या ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.

हेही वाचा-कुत्र्याला मारल्याने तिघांना बेदम मारहाण, हदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


तेलंगणा राज्यातील शेतकर्‍यांना विविध योजनेंतर्गत प्रत्येकाला दर वर्षी एकरी १०,००० रुपये आर्थिक मदत दिली जाते. आमचे सरकार आमच्या शेतकर्‍यांना यासारखी कोणतीही योजना राबवित नाही. तेलंगणा राज्यातील गरीब लोकांना पेन्शन म्हणून दरमहा २०१६ रुपये मिळतात. तर महाराष्ट्रात केवळ ५०० रुपये मिळतात. तेलंगणा राज्यात शेतकऱ्यांना चोवीस तास अखंडीत नि: शुल्क वीज मिळते. आमच्या राज्यात आम्हाला ८ तास वीजपुरवठा करण्याचे आश्वासन दिले जाते परंतु, प्रत्यक्षात आपल्याला फक्त ६ तास वीज मिळते. तेलंगणा राज्य आणि महाराष्ट्र राज्य लोकांमध्ये वैवाहिक संबंध असून सर्व एकमेकांचे पाहुणे आहेत. तेलंगणा राज्यात कल्याण लक्ष्मी, केसीआर किट्स आणि सणांच्या वेळी कपडे वाटप यासारख्या योजना महिलांना भरपूर मदत करतात. महाराष्ट्रात अशा कोणत्याही योजना नाहीत. काही दिवसांपूर्वी धर्माबाद तालुक्यातील ४० गावांनी तेलंगणा राज्यात विलीन करण्याच्या मागणीसाठी एक ठराव संमत केला होता. या ठरावाला उत्तर देताना महाराष्ट्र सरकारने या गावांना ४० कोटी रुपये अनुदान जाहीर केले आणि ते तातडीने १२ कोटी रुपये देणार असल्याचे सांगितले. परंतु, आजपर्यंत एक रुपयाही मिळाला नसल्याची खंत व्यक्त केली. तेलंगणा राज्यात रस्ते खूप चांगले आहेत, अशी तुलना करत त्यांनी मुख्यमंत्र्यांना टीआरएस पक्षाच्या तिकिटावर जागा मिळाल्यास निवडनणुक लढवण्याची ईच्छी व्यक्त केली.

दरम्यान, मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी शिष्टमंडळाला सांगितले की, नांदेड जिल्ह्यातील पाच विधानसभा क्षेत्रांतील लोकांशिवाय भिवंडी, सोलापूरसह आणि इतर विधानसभा मतदारसंघातीलही अनेकजन टीआरएस तिकिटांची मागणी करत आहेत. यावर लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे ते म्हणाले.

Last Updated : Sep 18, 2019, 6:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details