महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेड जिल्ह्यात हॉटेल्स बंद; फक्त पार्सल सेवा सुरू

जिल्ह्यातील कोरोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन नांदेड जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी यापूर्वी जिल्ह्यातील सर्व शाळा कॉलेज बंदचे आदेश दिले होते. आज बुधवार (दि.१७) रोजी नवा अध्यादेश काढला आहे.

nanded
नांदेड जिल्हाधिकारी

By

Published : Mar 17, 2021, 9:54 PM IST

नांदेड - जिल्ह्यातील कोरोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन नांदेड जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी यापूर्वी जिल्ह्यातील सर्व शाळा कॉलेज बंदचे आदेश दिले होते. आज बुधवार (दि.१७) रोजी नवा अध्यादेश काढला आहे. सर्व प्रकारचे हॉटेल्स, रेस्टॉरंट, ढाबे, परमिटरुम, बेकरी, स्वीटमार्ट, चाट भांडार, आदी बंद राहणार आहेत. बैठक बंद झाली तरी पण पार्सल सेवा मात्र रात्री दहापर्यंत सुरूच राहणार आहे. या व्यवसायावर उपजीविका असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय घेतला असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे.

हेही वाचा -अँटिलिया प्रकरण : सचिन वाझेंना घेऊन 'एनआयए'चे पथक घटनास्थळी

गर्दी टाळण्यासाठी घेतला निर्णय

नांदेड जिल्हयात सर्व प्रकारचे हॉटेल्स, रेस्टॉरंट, ढाबे, परमिटरुम, बेकरी, स्वीटमार्ट, चाट भांडार, इत्यादी ठिकाणी मोठया प्रमाणात नागरीकांची गर्दी होत आहे. त्यामुळे जिल्हयात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजनेचा एक भाग म्हणून नागरीकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी नांदेड जिल्हयातील सर्व प्रकारचे हॉटेल्स, रेस्टॉरंट, खाद्यगृह, ढाबे, परमिटरुम, बेकरी, स्वीटमार्ट, चाट भांडार, इत्यादी दि. १७ मार्च २०२१ ते दि. ३१ मार्च २०२१ या कालावधीमध्ये होम डिलिव्हरीचे किचनावितरण कक्ष (Take Away) वगळता पूर्णपणे बंद करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील सर्व जिम, व्यायामशाळा, सर्व प्रकारची उद्याने राहणार बंद

होम डिलिव्हरीचे किचनावितरण कक्ष (Take Away) हे रात्री १०:०० वाजेपर्यंत कोरोना प्रतिबंधक सर्व उपाययोजनांचे पालन करून सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व जिम, व्यायामशाळा, सर्व प्रकारची उद्याने हे दि. १७ मार्च २०२१ ते दि. ३१ मार्च २०२१ या कालावधीमध्ये पूर्णपणे बंद राहतील.

हेही वाचा -चारच दिवसात शेअर बाजार गुंतवणुकदारांनी गमाविले ५.५ लाख कोटी!

ABOUT THE AUTHOR

...view details