महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दारूसाठी पैसे न दिल्याने उकळते तेल टाकले अंगावर - booze

दारूसाठी पैसे न दिल्याने एकाच्या अंगावर उकळते तेल टाकल्याची घटना लोहा शहरात घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोहा शहरातील पालम मार्गावरील शिवाजी चौकात ही घटना घडली.

Hot oil poured on body after Man refuses to give money for booze
दारूसाठी पैसे न दिल्याने उकळते तेल अंगावर टाकले

By

Published : Mar 19, 2020, 11:34 AM IST

नांदेड -दारूसाठी पैसे न दिल्याने एकाच्या अंगावर उकळते तेल टाकल्याची घटना लोहा शहरात घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोहा शहरातील पालम मार्गावरील शिवाजी चौकात ही घटना घडली.

लोहा शहरातील पालम मार्गावरील शिवाजी चौकात राहुल जाधव यांच्या वडापाव गाड्यावर आरोपी विजय कांबळे (इंदिरानगर लोहा) हा काल (बुधुवार) दुपारी दीड वाजता गेला. आरोपी विजयने राहुलला दारू पिण्यास 100 रुपये मागितले. त्याने नकार दिला असता विजयने शिवीगाळ करून वडापावच्या गाड्यावरील कढईत असलेले उकळते तेल राहुलच्या अंगावर टाकले. तसेच जीवे मारण्याची धमकीही दिली. यामध्ये राहुलला गंभीर दुखापत झाली आहे. याबाबत राहुलने दिलेल्या तक्रारीवरून लोहा पोलीस ठाण्यात गुरनं ६६/२०२० कलम ३२६,५०६ या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details