महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लॉकडाऊनध्ये सुरू असलेल्या पानटपऱ्या अन् हॉटेलला ठोकले टाळे - अजितपालसिंह संधू

नांदेड शहारतील देगलूर नाका, खुदबईनगर, इतवारा येथे अनेक हॉटेल आणि पानटपऱया सुरू असल्याची माहिती महानगरपालिकेचे सहायक आयुक्त अजितपालसिंह संधू यांना मिळाली. त्यांनी तत्काळ एका पथकासह या परिसरातील हॉटेल आणि पानटपऱ्यांवर कारवाई केली.

Assistant Commissioner Ajitpal Singh Sandhu
सहायक आयुक्त अजितपालसिंह संधू

By

Published : Apr 4, 2020, 2:48 PM IST

नांदेड - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. या दरम्यान फक्त अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी आहे. मात्र, नांदेड शहारत काही हॉटेल आणि पान टपऱ्या सुरूच होत्या. याबाबत माहिती मिळताच महानगरपालिकेच्या पथकाने कारवाई करुन त्यांना सील केले.

कारवाई करताना पथकासह सहायक आयुक्त अजितपालसिंह संधू

नांदेड शहारतील देगलूर नाका, खुदबईनगर, इतवारा येथे अनेक हॉटेल आणि पानटपऱया सुरू असल्याची माहिती महानगरपालिकेचे सहायक आयुक्त अजितपालसिंह संधू यांना मिळाली. त्यांनी तत्काळ एका पथकासह या परिसरातील हॉटेल आणि पानटपऱ्यांवर कारवाई केली.

या कारवाईमध्ये एकूण सात इस्लामी हॉटेल आणि पाच पान टपऱ्या महापालिकेने सील केल्या आहेत. प्रशासनाच्यावतीने अनेकदा सूचना आणि आदेश देऊनही शहरतील काही भागातील हॉटेल चालक आपला व्यवसाय सुरू ठेवत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details