नांदेड -जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील हाणेगाव परिसरात तब्बल दोन तास मुसळधार पाऊस झाला. यामध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले असून नदी-नाले दुथडी भरून वाहत होते. तसेच घराकडे परत येणारा एक शेतकरी नाल्याच्या पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने वाहून गेला आहे. घरांमध्ये पाणी शिरल्याने अन्नधान्यासह घराचे प्रचंड नुकसान झाले आहे.
देगलूर तालुक्यात मुसळधार पाऊस; एकजण गेला वाहून, तर पिकांचे मोठे नुकसान - नांदेड पाऊस बातमी
यंदाच्या पावसाळ्यातील हाणेगाव परिसरात हा दुसरा सर्वात मोठा पाऊस आहे. सोमवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. दमदार पावसामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले. जवळपास दोन तास पावसाचा जोर वाढत गेल्याने खुतमापूर व सोमूर येथील पुलावरून पाणी वाहून आजूबाजूच्या शेतात शिरले.
यंदाच्या पावसाळ्यातील हाणेगाव परिसरात हा दुसरा सर्वात मोठा पाऊस आहे. सोमवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. दमदार पावसामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले. जवळपास दोन तास पावसाचा जोर वाढत गेल्याने खुत्मापूर व सोमूर येथील पुलावरून पाणी वाहून आजूबाजूच्या शेतात शिरले. अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन, कापूस, मूग, उडीद व तूर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हाणेगावमधील अनेकांच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे घरातील अन्न-धान्याची नासाडी झाली व अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. हनेगाव येथील शेतकरी हनुमंत गोविंद (वय ५८) हे शेताकडे बैल चारण्यासाठी गेले होते. पाऊस पडू लागल्याने ते घराकडे परत येत असताना शेतीच्या मार्गात पाण्याचा मोठा प्रवाह असल्याने ते पाण्यात वाहून गेले. याबाबत मरखेल पोलीस ठाण्याला माहिती दिल्यानंतर त्या शेतकऱ्याचा शोध घेणे सुरू आहे. पावसामुळे हाणेगाव, खुत्मापूर व सोमूर परिसरात शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शासनाने तत्काळ चौकशी करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरीवर्गाकडून होत आहे.