महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Hadgaon Accident : अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाच कुटुंबातील तीन ठार - हदगाव अपघात

पंढरपूरहून आणलेला प्रसाद वाटण्यासाठी दुचाकीवर हदगावकडे ( Hadgaon Accident ) निघालेल्या तिघांचा अपघात होवून मृत्यू ( three died in the accident ) झाला आहे. ही घटना नांदेड- नागपूर रोडवरील बरड शेवाळा येथे शुक्रवारी (ता.१५) सायंकाळी चारच्या सुमारास घडली. संतोष कोंडबा टोपलेवार (२९), सुरेखा संतोष टोपलेवार (२५) व सतीश मसाजी टोपलेवार (२५) (सर्व रा.बामणी आबादी ता. हदगाव) असं मृतांची नावे आहेत.

Hadgaon Accident
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाच कुटुंबातील तीन ठार

By

Published : Jul 15, 2022, 10:18 PM IST

नांदेड - वडिलांनी पंढरपूरहून आणलेला प्रसाद वाटण्यासाठी दुचाकीवर हदगावकडे ( Hadgaon Accident ) निघालेल्या तिघांना अज्ञात वाहनाने उडविले. यात तिघेही जागीच ठार ( three died in the accident ) झाले असून ही घटना नांदेड- नागपूर रोडवरील बरड शेवाळा येथे शुक्रवारी (ता.१५) सायंकाळी चारच्या सुमारास घडली. संतोष कोंडबा टोपलेवार (२९), सुरेखा संतोष टोपलेवार (२५) व सतीश मसाजी टोपलेवार (२५) (सर्व रा.बामणी आबादी ता. हदगाव) असं मृतांची नावे आहेत. हदगाव तालुक्यातील बामणी आबादी येथील संतोष कोंडबा टोपलेवार, सुरेखा संतोष टोपलेवार व सतीश मसाजी टोपलेवार हे कुटुंब मोलमजुरी करून उपजीविका भागवणारे होते.

हेही वाचा -वऱ्हाड निघाले पुरातून; लग्नासाठी पैनगंगेतून 7 KM नवरदेवचा प्रवास; अखेर मुहुर्तावर केले थाटात लग्न

वडील कोंडबा टोपलेवार हे पंढरपूरहुन वारी ( Pandharpur Wari ) करून परत आले होते. वडिलांनी पंढरपूरहूनसोबत आणलेला प्रसाद घेऊन त्यांचा मुलगा संतोष, त्याची पत्नी व कुटुंबातील अन्य एकजण असे तिघेजण हदगाव येथील नातेवाईकांना हा प्रसाद देण्यासाठी दुचाकीवरून जात होते. त्यावेळी वाहनाच्या धडकेत हे दुचाकीवरील तिघेही ठार झाले. अपघाताची माहिती मनाठा पोलीस ठाण्याचे ( Manatha Police Station ) सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांना भ्रमणध्वनीवरून समजताच ते तात्काळ घटनास्थळी पोहोचले. मृत व्यक्तींना हदगाव उपजिल्हा रुग्णालय ( Hadgaon Hospital ) येथे उत्तरीय तपासणीसाठी आणण्यात आले आहे. टोपलेवार कुटुंबावर काळाने घातलेल्या आघाताने कुटुंबातील तीन व्यक्ती एकाच वेळी मृत्युमुखी पडल्या आहेत. या घटनेमुळे बरडशेवाळा गावासह सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा -Devendra Fadnavis : मुख्यमंत्रीपद हिसकावल्यानंतर फडणवीसांवर केंद्राचा 'वॉच'; मर्जीतील अधिकाऱ्याकडे सोपवला कारभार

ABOUT THE AUTHOR

...view details