महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'घटस्फोटीत पोटगी न मिळणाऱ्या महिलांना धान्य पुरवावे' - नांदेड संचारबंदी

पोटगी देण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. पतीने मंजूर झालेली पोटगीची रक्कम कौटुंबिक न्यायालयात जमा करायची असते, त्यानंतर पत्नीने न्यायालयात स्वतः येऊन ही पोटगीची रक्कम घेऊन जायची अशी ही पद्धत आहे.

घटस्फोटित पोटगी न मिळणाऱ्या महिलांना धान्य पुरवावे - न्यायाधीश स्वाती चव्हाण
घटस्फोटित पोटगी न मिळणाऱ्या महिलांना धान्य पुरवावे - न्यायाधीश स्वाती चव्हाण

By

Published : Apr 20, 2020, 7:28 PM IST

नांदेड- लॉकडाऊनमध्ये घटस्फोटीत महिलांना पोटगी मिळण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशाने पीडित महिलांना धान्य पुरवण्याचे आदेश जिल्हा पुरवठा विभागाला दिले आहेत. माणुसकीच्या नात्याने कौटुंबिक न्यायालयाने स्वतः दखल घेत काढलेले हे आदेश अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत.

घटस्फोटित पोटगी न मिळणाऱ्या महिलांना धान्य पुरवावे - न्यायाधीश स्वाती चव्हाण

पोटगी देण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. पतीने मंजूर झालेली पोटगीची रक्कम कौटुंबिक न्यायालयात जमा करायची असते, त्यानंतर पत्नीने न्यायालयात स्वतः येऊन ही पोटगीची रक्कम घेऊन जायची अशी ही पद्धत आहे. मात्र, गेल्या महिनाभरापासून लॉकडाऊनमुळे न्यायालयात येण्यासाठी पती-पत्नी दोघांनाही अडचणी येत आहेत. त्यातून पीडित महिलांची उपासमार होऊ शकते, त्यामुळे नांदेडच्या कौटुंबिक न्यायालयाने या पीडित महिलांना धान्य पुरवावे, असे आदेश कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना दिले आहेत. या आदेशामुळे लॉकडाऊनच्या काळात घटस्फोटीत महिलांची उपासमार टळणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details