नांदेड - जगभरातील नागरीक करोनामुळे त्रस्त झाले असून, शास्त्रज्ञांनी प्रतिबंधात्मक लसीचा शोध लावला आहे. पण गेल्या पंचवीस वर्षात कृषी विद्यापीठ, केळी स़ंशोधन केंद्राला व संशोधकांना केळीवर पडणाऱ्या करपा रोगावर प्रभावी असे औषध शोधण्यास यश आले नाही. सध्या अर्धापूर तालुक्यातील व परिसरातील केळीच्या बागांना व्हायरसची बाधा होत आहेत. या बागा रात्रीतून पिकतात. याचा परिणाम केळीच्या भावावर झाला आहे. भाव निम्म्याने कमी झाले आहेत. या रोगाची फळ पिक विम्यासाठी नोंद नसल्याने विम्याचा लाभ नाही, भाव नाही' व्यापारी केळी घेत नाहीत अशा तिहेरी स़ंकटात शेतकरी सापडला आहे. केळीचे घड शेतात सडून जाताना पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू येत आहेत. दरम्यान, केळीचा लागवडीसाठी लागल़ेला खर्च निघने अवघड झाले आहे.
१९९५ मध्य आला होता हा रोग
अर्धापूर तालुक्यात व परिसरातील गावांत केळीची लागवड क्षेत्र खूप मोठे आहे. राज्यात जळगाव नंतर नांदेड जिल्ह्यात केळीच्या बागा जास्त आहेत. या भागात १९९५ मध्ये करपा या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात झाला. केळीच्या बागा रात्रीतून पिकून गेल्या होत्या. तेंव्हापासून या भागात हा रोगाचा प्रादुर्भाव कमी अधिक प्रमाणात होत असतो.
उत्पन्न तर नाहीच खर्च निघणेही अवघड