नांदेड- जिल्ह्यातील अर्धापूर शहरातील सुदाम जडे यांच्या घरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून तब्बल चार लाख ४२ हजार रुपयांचा प्लास्टिकसाठा जप्त केला आहे. प्लास्टिक बंदी संदर्भाने करण्यात आलेल्या या धडक कारवाईने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
अर्धापुरात पोलिसांच्या छाप्यात चार लाखांचा प्लास्टिकसाठा जप्त - गोपनिय माहिती
अर्धापूर शहरातील सुदाम जडे यांच्या घरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून तब्बल चार लाख ४२ हजार रुपयांचा प्लस्टिक जप्त केला आहे. ही प्लस्टिक ब्ंदी संदर्भाने मोठी धाड असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
पोलिसांच्या छाप्यात चार लाखांचे प्लस्टिक जप्त
शहरात व ग्रामीण भागातील प्लास्टिकने प्रदुषण वाढले आहे. त्यामुळे प्लास्टिक बंदी केली आहे. पोलीस अधिक्षक संजय जाधव यांनी स्थानिक गुन्हे शाखेला प्लास्टिक बाबत गोपनिय माहिती दिली. आणि प्रतिबंधीत केलेल्या प्लास्टिक साठ्यावर कार्यवाही करण्याचे आदेश दिले.