महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Former MP Subhash Wankhede: उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत माजी खासदार सुभाष वानखेडे शिवबंधन बांधणार

माजी खासदार सुभाष वानखेडे ( Former MP Subhash Wankhede ) मुंबई येथे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Shiv Sena party chief Uddhav Thackeray ) यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधणार असल्याची माहिती शिवसेनेचे हिंगोली जिल्हा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांनी दिली आहे.

सुभाष वानखेडे शिवसेनेत परतणार
सुभाष वानखेडे शिवसेनेत परतणार

By

Published : Jul 20, 2022, 7:16 AM IST

नांदेड - माजी खासदार सुभाष वानखेडे ( Former MP Subhash Wankhede ) मुंबई येथे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Shiv Sena party chief Uddhav Thackeray ) यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधणार असल्याची माहिती शिवसेनेचे हिंगोली जिल्हा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांनी दिली आहे. याबरोबरच आगामी काळात हिंगोली व नांदेड जिल्ह्यात अनेक पक्षातील नेते शिवसेनेत ( Shivsena ) प्रवेश करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. शिवसेनेची शक्ती काय आहे, हे आम्ही कळमनुरीसह हिंगोली जिल्ह्यात दाखवून देऊ असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

शिवसेना संघटना बांधणीसाठी कामाला लागले -खासदार हेमंत पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता शिवसेनेचे पक्षनेतृत्व शिवसेना संघटना बांधणीसाठी कामाला लागले आहे. जुन्या शिवसैनिकांना जवळ घेऊन पक्षसंघटना, पक्ष बांधणीचे काम आगामी काळात मोठ्या जोमाने करण्याचा विडा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतल्याचे दिसून येत आहे. खा. पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केल्यानंतर हिंगोली लोकसभा मतदारसंघात त्याचे पडसाद उमटत आहेत.

2009 लोकसभेत केंद्रीय ग्रामविकास मंत्री सूर्यकांत पाटीलांचा पराभव - हिंगोली लोकसभा मतदारसंघातील महत्वाचा मानला जाणारा नांदेड जिल्ह्यातील हदगाव विधानसभा मतदारसंघातील हा महत्वाचा मानला जातो. 1995 साली सुभाष वानखेडे हे पहिलांदा हदगाव मधून विधानसभेत गेले होते. 15 वर्ष ते आमदार म्हणून राहिले, मग 2009 लोकसभेमध्ये केंद्रीय ग्रामविकास मंत्री सूर्यकांत पाटील यांचा पराभव करत ते लोकसभेत गेले होते. सुभाष वानखेडे यांचा हदगाव सह हिमायतनगर, तामसल्याहारी, हिंगोली कळमनुरी, उमरखेड, किनवट या गावात त्यांची प्रचंड लोकप्रियता आहे. आणि त्याचा जनसंपर्क दांडगा आहे. 2014 साली राजीव सातव यांचा कडून पराभव झाला होता. 2019 साली हेमंत पाटील यांच्याकडून देखील पराभव झाला होता. हिंगोलीमध्ये सध्या वानखेडे यांच्या प्रवेशामुळे शिवसैनिकांमध्ये नवीन उत्साह निर्माण झाला आहे.

2014 ची राजकीय परिस्थिती -2014 च्या लोकसभा निवडणुकीत खासदार राजीव सातव हे १ हजार ६३२ मतांनी विजयी झाले होते. त्यांनी सध्या काँग्रेसवासी झालेल्या शिवसेनेच्या सुभाष वानखेडेचा पराभव केला होता. आतापर्यंत हिंगोली लोकसभा मतदारसंघाने कोणत्याही एका पक्षाच्या बाजूने कौल दिलेला नाही. जनता पक्ष, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी या वेगवेगळ्या पक्षांच्या उमेदवारांना मतदारांनी संधी दिली होती.

हेही वाचा -Aditya Thackeray criticism : 'गद्दार हा गद्दारच असतो', आदित्य ठाकरेंचा बंडखोर आमदारांवर जोरदार हल्लाबोल

ABOUT THE AUTHOR

...view details