महाराष्ट्र

maharashtra

नांदेड जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त

जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून रुग्णसंख्येत घट होत असून सलग चौथ्या दिवशीही कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. आज प्राप्त झालेल्या 4 हजार 344 अहवालांपैकी 1 हजार 105 अहवाल कोरोनाबाधित आले आहेत.

By

Published : Apr 25, 2021, 9:59 PM IST

Published : Apr 25, 2021, 9:59 PM IST

Corona patient recovery rate Nanded
कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण नांदेड

नांदेड - जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून रुग्णसंख्येत घट होत असून सलग चौथ्या दिवशीही कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. आज प्राप्त झालेल्या 4 हजार 344 अहवालांपैकी 1 हजार 105 अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 895, तर अँटिजेन तपासणीद्वारे 210 अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समजले आहे.

हेही वाचा -नांदेड : प्रतीक्षेत असलेले महामार्ग केंद्र औरंगाबाद विभागाला जोडा; महामार्ग पोलिसांची आमदाराकडे मागणी

जिल्ह्यात आजवर एकूण बाधितांची संख्या 76 हजार 55 एवढी झाली असून यातील 61 हजार 171 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 13 हजार 193 रुग्ण उपचार घेत असून 249 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. 23 ते 25 एप्रिल या तीन दिवसांच्या कालावधीत 27 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. नांदेड जिल्ह्यातील मृत कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1 हजार 430 एवढी झाली आहे.

उपलब्ध खाटांची संख्या

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 21, जिल्हा रुग्णालय कोविड रुग्णालय नांदेड येथे 8, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 25 खाटा उपलब्ध आहेत.

जिल्ह्यातील कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकूण घेतलेले स्वॅब - 4 लाख 43 हजार 549
एकूण निगेटिव्ह स्वॅब - 3 लाख 58 हजार 625
एकूण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती - 76 हजार 55
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या - 61 हजार 171
एकूण मृत्यूसंख्या - 1 हजार 430
उपचारानंतर बाधित व्यक्ती बरे होण्याचे प्रमाण - 80.42 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णित संख्या - 28
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या - 69
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या - 364
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती - 13 हजार 193
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले - 249

हेही वाचा -कोरोना रुग्णांना दिलं जाणारं भोजन निकृष्ट, आमदार बालाजी कल्याणकरांनी कंत्राटदाराला धरले धारेवर

ABOUT THE AUTHOR

...view details