नांदेड - नांदेडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली असून सकाळी तिघांना कोरोनाची लागण झाल्याची चर्चा अद्याप सुरूच असताना दुपारी आणखी दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नांदेड शहर आणखी हादरले आहे. शनिवारी (दि. 2 मे) 20 आणि आज (3 मे) 5 नवे कोरोना रुग्ण आढळून आल्याने ही आजपर्यंत कोरोग्रस्तांची संख्या 31वर पोहोचली आहे.
नांदेडमध्ये दुपारपर्यंत 5 नवे कोरोनाग्रस्त, बाधितांची संख्या 31वर - nanded
आज आढळून आलेल्या 5 पैकी एका महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी एका महिलाचा व एकाचा ६४ वर्षीय वृद्धाचा अहवाल कोरोनाचा दुसरा अहवाल नेगिटिव्ह आल्यानंतर मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत नांदेडमध्ये मृतांची संख्या तीन झाली आहे.
आज आढळून आलेल्या 5 पैकी एका महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी एका महिलाचा व एकाचा ६४ वर्षीय वृद्धाचा अहवाल कोरोनाचा दुसरा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत नांदेडमध्ये मृतांची संख्या तीन झाली आहे.
सकाळी अहवाल आला अन् दुपारी त्या महिलेचा मृत्यू ..!
गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या रहमतनगर भागातील महिलेचा अहवाल आज सकाळी पाझिटिव्ह आल्यानंतर आज दुपारी त्या महिलेचा मृत्यू झाला आहे. या महिलेला 'सारी'चीही बाधा असल्याचे सांगितले जात आहे.
नांदेडचे 'ते' खासगी रुग्णालय सील..!
नांदेडच्या खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या महिलेला कोरोनाची बाधा झाल्याची घटना उघडकीस आली. रहमतनगर येथील महिला उपचार घेत होती. त्या खासगी रुग्णालयाच्या आतील सर्व भाग निर्जंतुक करून रुग्णालय सील करण्यात येत आहे. त्याचबरोबर या महिलेच्या निकटच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत.
हेही वाचा -मोलमजुरी करून जगणाऱ्या शेकडो मजूर कुटुंबाना मिळाला मदतीचा हात