महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेड : गुरुद्वारात पहिला प्रकाशवर्ष दिवस उत्साहात - नांदेड गुरुद्वारा न्यूज

गुरुद्वारा सचखंड साहेबमध्ये सकाळी ३ वाजल्यापासून पुजा-पाठ, कीर्तन, अरदास, प्रार्थना, मुख्वाख,कथा व्याख्यान, विशेष लंगर वाटप करण्यात आले.

प्रकाशवर्ष साजरा करण्यासाठी आलेले भाविक

By

Published : Sep 1, 2019, 12:45 PM IST

Updated : Sep 1, 2019, 12:51 PM IST

नांदेड - शीख धर्माचे पाचवे गुरु अर्जन देवजी यांनी इ.स. १६०४ मध्ये भारतातील सर्व धर्म जातीच्या संतांना गुरुजींना एकत्र करुन रोज परमेश्वराच्या स्तुतीसाठी श्लोक, शब्द, गुरबाणी उच्चारण करुन घेतली. त्यानंतर त्यांचे एकत्र संग्रह करुन एक ग्रंथ तयार करुन घेतला (त्या ग्रंथ साहेबांचे) पठण करण्यास सुरुवात केली. त्या दिवसाची आठवण म्हणून पहिला प्रकाश दिवस देश विदेशातील गुरुद्वारात मोठ्या भक्ती भावाने साजरा केला जात आहे.

नांदेडमधील गुरुद्वारामध्ये पहिला प्रकाशवर्ष दिवस साजरा

नांदेडमध्येचं श्री गुरु गोविंदसिंघ महाराजांनी ११ वे गुरु म्हणुन गुरुगादी प्रदान केलेली आहे. शनिवार दि.३१ ऑगस्ट २०१९ ला गुरुद्वारा सचखंड साहेबमध्ये सकाळी ३ वाजल्यापासून पुजा-पाठ, कीर्तन, अरदास, प्रार्थना, मुख्वाख,कथा व्याख्यान, विशेष लंगर वाटप करण्यात आले. यावेळी हजारो स्त्री-पुरुष, युवक-युवतींनी गुरुद्वारात माथा टेकुन प्रसाद व लंगर प्रसाद आनंदाने घेतला.

Last Updated : Sep 1, 2019, 12:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details