नांदेड - प्रचारसभेत एकेरी उल्लेख केल्याने तसेच, कुटूंबीयांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने आज माहुर येथे शिवसेना, भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकाऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली. यामुळे माहूर शहरात संचारबंदीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.
भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये तुंबळ हाणामारी, नांदडेमध्ये प्रचारसभेतील वक्तव्यावरुन झाला वाद - ncp
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेना उमेदवार हेमंत पाटील यांच्या प्रचारार्थ वाई बाजार येथे सभा आयोजित करण्यात आली होती. सभेमध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते सुमित राठोड यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष समाधान जाधव यांच्यावर एकेरी भाषेत टिका केली.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेना उमेदवार हेमंत पाटील यांच्या प्रचारार्थ वाई बाजार येथे सभा आयोजित करण्यात आली होती. सभेमध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते सुमित राठोड यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष समाधान जाधव यांच्यावर एकेरी भाषेत टिका केली. तसेच जाधव कुटूंबीयांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले.
यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यात वाद झाला. याचे पर्यवसन हाणामारीत झाले. या हाणामारीच्या घटनेमुळे माहूर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी आद्यपर्यंत कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही.