नांदेड - आठवडे बाजारात वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून शिस्त लावण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या महापालिका आणि पोलिसांना शुक्रवारी (दि 7) शेतकरी आणि विक्रेत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले . यावेळी अनेकांनी गोंधळ घालून रस्त्यावर भाजीपाला फेकल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
हेही वाचा -नांदेडमध्ये पुन्हा एकदा अशोक चव्हाणांचे वर्चस्व; पोटनिवडणुकीत सहा पैकी पाच जागेवर काँग्रेसचे वर्चस्व
नांदेडला आठवड्यातील जवळपास प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या भागात आठवडे बाजार भरतो. या बाजारात भाजीपाला, फळांची विक्री करण्यासाठी शहरासह जिल्ह्यातील आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांतील शेतकरी, विक्रेते येत असतात. शुक्रवारच्या दिवशी गोकुळनगर आणि शिवाजीनगर भागात बाजार भरतो. मात्र , यावेळी गोकुळनगर भागातून रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या तसेच व्हीआयपी रस्त्यावर आठवडे बाजार भरवू नये, तर नेमून दिलेल्या जागेवर आणि रस्त्यावर भरवावा, अशा सूचना महापालिकेने केल्या होत्या. मात्र, काही विक्रेत्यांनी स्टेडीयमसमोर गोकुळनगर भागात मुख्य रस्त्यावरच बाजार भरविला.