नांदेड- जिल्ह्यातील देगलूर येथे शेतकऱ्यांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी पीक विमा, दुष्काळी मदत तसेच कर्जमाफी देण्याच्या मागण्या करण्यात आल्या. दुष्काळी संघर्ष समितीचे प्रमुख कैलास येसगे यांनी या आंदोलनाचे नेतृत्त्व केले.
देगलूरमध्ये उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन - नांदेड
उपजिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय कार्यालयाबाहेर येऊन मागणीचे निवेदन स्वीकारावे, अशी मागणी आंदोलकांनी केली.
उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे आंदोलन
उपजिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय कार्यालयाबाहेर येऊन मागणीचे निवेदन स्वीकारावे, अशी मागणी आंदोलकांनी केली. त्यासाठी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर आंदोलन केले. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. अखेर उपजिल्हाधिकारी शक्ती कदम यांनी बाहेर येऊन मागण्यांचे निवेदन स्वीकारले. मागण्या मान्य होईपर्यंत हा लढा चालूच ठेवणार असल्याची ठाम भूमिका घेतल्याचे कैलास येसगे यांनी सांगितले आहे.