महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nanded News : चर्चा तर होणारच! तीस गुंठे शेतात केली वांग्याची लागवड; चार लाखाचे काढले उत्पन्न - भाजी पाला

नांदेड येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने अवघ्या ३० गुंठे शेतात वांग्याची लागवड केली. एवढ्या पिकात त्याने तब्बल ४ लाखांचे उत्पन्न काढले आहे. जाणून घेऊया त्यांचा प्रवास कसा होता.

Nanded  News
वांग्याची केली लागवड

By

Published : Jul 15, 2023, 5:34 PM IST

माहिती देताना शेतकरी

नांदेड: जिल्ह्यात सद्या खरिपाच्या पेरण्या सोबतच भाजीपाला लागवडीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. अवघ्या तीस गुंठे शेतात वांग्याची लागवड करून चार लाखाचे उत्पन्न काढण्याचा विक्रम, नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील जांभळा येथील शेतकरी निरंजन सरकुंडे यांनी केला आहे.

वांग्याची केली लागवड: पारंपरिक पीक पद्धती सोबत आता भाजीपाला लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. बाजारात भाजीपाल्याला योग्य भाव मिळत असल्याने, शेतकऱ्यांना उत्पन्न देखील चांगले मिळत आहे. हदगाव तालुक्यातील जांभळा येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने अवघ्या ३० गुंठे शेतात वांग्याची लागवड केली. यातून त्यांनी तीन ते चार लाख रुपयाची कमाई केली आहे. निरंजन सरकुंडे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. निरंजन यांना ५ एकर एकर शेती आहे. यापूर्वी सरकुंडे हे आपल्या शेतात पारंपारीक पीक घेत होते. मात्र त्यांना म्हणावे तसे उत्त्पन्न मिळत नव्हते.

३० गुंठे शेतीत वांग्याची लागवड : सद्या बाजारात भाजीपाल्याला चांगला दर मिळत आहे. शेजारी असलेल्या ठाकरवाडी या गावातील शेतकऱ्यांचा कल भाजीपाला लागवडीकडे वाढल्याचे पाहून, निरंजन सरकुंडे यांनी पारंपरिक शेतीसोबतच भाजीपाला शेती करण्यास सुरुवात केली. एकूण ५ एकर शेतीपैकी निरंजन यांनी ३० गुंठे शेतीत वांग्याची लागवड केली. दोन बाय दोन बेड पद्धतीने या वांग्याची लागवड करण्यात आली. पाणी कमी असल्याने, पाण्याची बचत व्हावी यासाठी ठिबकचा वापर करून पाण्याचे योग्य नियोजन केले.

2 लाखांचे झाले उत्पन्न : दोन महिन्यात वांगे तोडणीला आले असून जवळच्या उमरखेड आणि भोकर या बाजारात या वांग्याची विक्री केली जाते. सध्या बाजारात भाजीपाल्याला चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे निरंजन सरकुंडे यांना या 30 गुंठे क्षेत्रावर असलेल्या वांग्याच्या उत्पादनातून जवळपास 2 लाखांचे निवळ उत्पन्न झाले आहे. यासाठी केवळ 30 हजारांचा खर्च आला आहे. भाजीपाला शेती परवडणारी असल्याने सध्या जांभळा या गावातील शेतकरी आता भाजीपाला शेतीकडे वळताना दिसत आहेत.

हेही वाचा -

  1. Nanded News: शेतकऱ्यानं माळरानावर फुलवले नंदनवन; यासाठी केला देशी जुगाड
  2. Tomato Price Controversy: टोमॅटोवरून ग्राहक आणि विक्रेते आपापसात भिडले; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
  3. Dishantar Annapurna Project : मांडवखरीमध्ये महिलांनी दिशांतर संस्थेच्या माध्यमातून फुलवला भाजीचा मळा

ABOUT THE AUTHOR

...view details