नांदेड - लोहा तालुक्यातील पारडी येथे एका वयोवृद्ध शेतकऱ्यानं पंकजा मुंडे यांना पाहताच हंबर्डा फोडला. आमचं सगळं गेलं आम्ही कसं जगायचं? असा सवाल या शेतकऱ्यानं विचारला. पंकजा मुंडे यांनीदेखील या शेतकऱ्याचं सांत्वन केलं व त्यांना धीर दिला. पांडुरंग पवार असे त्या वयोवृद्ध शेतकऱयाचे नाव आहे.
VIDEO :...म्हणून वयोवृद्ध शेतकरी पंकजा मुंडेंसमोर रडला
लोहा तालुक्यातील पारडी येथे एका वयोवृद्ध शेतकऱ्यानं पंकजा मुंडे यांना पाहताच हंबर्डा फोडला. पांडुरंग पवार असे त्या वयोवृद्ध शेतकऱयाचे नाव आहे.
दुष्काळ पाहणी करण्यासाठी भाजपाच्या केंद्रीय सचिव पंकजा मुंडे नांदेड दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी नांदेड आणि लोहा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी त्यांनी केली. बाजूच्या शेतात पाहणी करत असलेल्या पंकजा मुंडे यांना पाहून एका वयोवृद्ध शेतकऱ्याला रडू कोसळलं. ताई इकडं या माझ्या शेतात बघा, आम्ही कसं जगायचं. मूग गेला, सोयाबीन गेला, कापूस गेला आमचं सगळं गेलं... आम्ही कसं जगायचं? असा प्रश्न वयोवृद्ध शेतकरी पांडुरंग पवार यांनी विचारला.. पंकजा मुंडे यांनीदेखील या शेतकऱ्याला सावरण्याचा प्रयत्न केला. यावेळी गोपीनाथ मुंडे यांची आठवण देखील शेतकऱ्यांनी काढली.