महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेडच्या उमरीत वादळी वाऱ्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान, जनजीवन विस्कळीत - power supply

वादळी वाऱ्यांसह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून शासनाने मूलभूत सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष माजी आ.बापुसाहेब देशमुख गोरठेकर यांनी केली आहे

उमरी तालुक्यात चक्रीवादळामुळे शेतीचे नुकसान;

By

Published : Jun 7, 2019, 4:54 PM IST

नांदेड -उमरी तालुक्यामध्ये ४ जूनला वादळी वाऱ्यांसह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून शासनाने मूलभूत सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष माजी आ.बापुसाहेब देशमुख गोरठेकर यांनी केली आहे. या संदर्भातील एक निवेदन त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना सादर केले आहे.


उमरी तालुक्यामध्ये ४ जून रोजी सायंकाळच्या सुमारास चक्रीवादळाचा तडाखा बसला होता. यात फळबागा व शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. या तडाख्यात अनेक नागरिक जखमी झाले आहेत. तर अनेक जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत.वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब उन्मळून पडले तर काही ठिकाणी तारा तुटल्यामुळे शहरातील व ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसापासून येथील नागरिक समस्यांचा सामना करीत आहेत.


शासनाने युद्ध पातळीवर आपदग्रस्तांना त्वरीत मदत द्यावी. याचबरोबर विद्युत पुरवठा सुरळीत करावा आणि सर्व बाबींची गांभीर्याने चौकशी करावी, अशी मागणी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनामध्ये जिल्हाध्यक्ष गोरठेकर यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details