नांदेड- गुरूवारी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर २ हजार २८ मतदान केंद्रावरील इव्हीएम मशीन स्ट्राँगरुममध्ये पोहोचल्या आहेत. प्रशासनाच्या निगराणीखाली रात्रभर या इव्हीएम मशीन सुरक्षित ठेवण्याचे काम सुरू होते.
महिनाभरासाठी ईव्हीएम मशीन स्ट्राँगरूममध्ये बंदिस्त; सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा असणार 'पहारा' - मतदान
नांदेडच्या पॉलिटेक्नीक कॉलेजमधील स्ट्राँगरुममध्ये ईव्हीएम मशीन्स पोहोचवण्याची तयारी सुरू झाली. निवडणूक प्रक्रिया अत्यंत चोख व व्यवस्थितपणे पार पडल्यानंतर जिल्हा प्रशासनाला या इव्हीएम मशीन महिनाभर सुरक्षितपणे ठेवण्याची जबाबदारी आता पार पाडावी लागणार आहे. सीसीटीव्ही, कॅमेऱ्याच्या नजरेखाली असणाऱ्या या स्ट्राँगरुमच्या चारही बाजुला २४ तास पोलिसांचा खडा पहारा राहणार असून याठिकाणी कोणालाही प्रवेश करता येणार नाही.
निवडणूक प्रक्रिया अत्यंत चोख व व्यवस्थितपणे पार पडल्यानंतर जिल्हा प्रशासनाला या इव्हीएम मशीन महिनाभर सुरक्षितपणे ठेवण्याची जबाबदारी आता पार पाडावी लागणार आहे. सीसीटीव्ही, कॅमेऱ्याच्या नजरेखाली असणाऱ्या या स्ट्राँगरुमच्या चारही बाजुला २४ तास पोलिसांचा खडा पहारा राहणार असून याठिकाणी कोणालाही प्रवेश करता येणार नाही.
नांदेडच्या पॉलिटेक्नीक कॉलेजमधील स्ट्राँगरुममध्ये या मशीन्स पोहोचवण्याची तयारी सुरू झाली. सुरूवातीला इव्हीएम मशीन त्या त्या विधानसभानिहाय स्ट्राँगरुममध्ये आणण्यात आल्या. त्यानंतर प्रशासनाकडून दिलेल्या व परत आलेल्या इव्हीएम मशीनची मोजणी करण्यात आली. मशीनचे आकडे जुळल्यानंतर प्रत्येक बुथनिहाय इव्हीएम मशीन जीपीएस यंत्रणा असलेल्या वाहनामध्ये ठेऊन ती नांदेडकडे रवाना करण्यात आली. रात्री सुरू झालेली ही प्रक्रिया सकाळी उशीरापर्यंत सुरू होती.