नांदेड - जिल्ह्यातील हातनी (उमरी) येथील महिलेच्या अंगावर वीज कोसळल्याने महिला व तिचा मुलगा ठार झाला आहे. तर मुलगी गंभीर जखमी झाली आहे. शेतात कचरा वेचत असतांना अचानक सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आणि वीजांसह पाऊस झाला. पाऊसामुळे झाडाच्या आधाराने बसलेल्या माय-लेकरावर वीज कोसळल्याने जागीच ठार झाल्याची घटना सायंकाळी सातच्या सुमारास घडली.
वीज पडून उमरी तालुक्यात माय-लेक ठार ; मुलगी गंभीर जखमी - घटनास्थळी
तालुक्यातील सुशीला गोविंद सुरने (वय २७) ह्या शेतात कचरा वेचत होत्या. त्यांच्या शेजारी त्यांचा मुलगा राजेश गोविंद सुरने (वय ४) व मुलगी मुक्ताबाई गोविंद सुरने (वय ६) ह्या शेजारी होत्या. सायंकाळी साडे सहाच्या सुमारास अचानक वादळी वारा, वीजांसह पाऊस आल्याने या तिघांनी झाडाचा आधार घेतला.
याबाबत प्राप्त माहिती अशी की, तालुक्यातील सुशीला गोविंद सुरने (वय २७) ह्या शेतात कचरा वेचत होत्या. त्यांच्या शेजारी त्यांचा मुलगा राजेश गोविंद सुरने (वय ४) व मुलगी मुक्ताबाई गोविंद सुरने (वय ६) ह्या शेजारी होत्या. सायंकाळी साडे सहाच्या सुमारास अचानक वादळी वारा, वीजांसह पाऊस आल्याने या तिघांनी झाडाचा आधार घेतला.
झाडाखाली थांबलेल्या तिघांवर वीज पडल्याने यामधील सुशीला गोविंद सुरने (वय २७), राजेश गोविंद सुरने (वय ४) हे दोघे जागीच ठार झाले. तर त्यांची मुलगी मुक्ताबाई सुरने ही गंभीर जखमी झाली. या घटनेची माहिती मिळताच, गावातील शिवसेनेचे कैलास.पा.हातनीकर यांनी घटनास्थळी जाऊन तहसिलदार राजेश लांडगे यांना माहिती दिली. त्यावरून घटनास्थळी मंडळ अधिकारी श्री.बाचेपल्ले, उद्धव पाटील, माधव कदम यांनी भेट देऊन वरीष्ठानां कळविले. जखमी मुक्ताबाई सुरने हीस पुढील उपचारार्थ नांदेड येथे हलविण्यात आले आहे.