महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेडमध्ये दुष्काळाची दाहकता वाढली; टँकरची संख्या ८७ वर....! - well

नांदेड - दुष्काळाची दाहकता वाढल्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत असून सध्या जिल्ह्यात ८७ टँकरद्वारे ५१ गावे आणि १९ वाडी-तांड्यांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

टँकरचे पाणी घेण्यासाठी गावकऱ्यांनी लावलेली रांग

By

Published : May 7, 2019, 7:11 PM IST

नांदेड- दुष्काळाची दाहकता वाढल्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत असून सध्या जिल्ह्यात ८७ टँकरद्वारे ५१ गावे आणि १९ वाडी-तांड्यांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात ६६१ खासगी विहिरी व विंधनविहिरींचे (बोअर) अधिग्रहण करण्यात आले असून त्याद्वारे ६०७ गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

टँकरचे पाणी घेण्यासाठी गावकऱ्यांनी लावलेली रांग


गतवर्षी पाऊस कमी पडल्यामुळे परिणामी यंदा प्रकल्पात जलसाठा कमी झाला आहे. त्यामुळे पाणीटंचाईला गेल्या तीन महिन्यापासून सुरवात झाली असून मे महिन्यात टंचाई वाढली आहे. टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असलेल्या गावांची संख्या ५१ असून वाडी-तांड्यांची संख्या १९ आहे. १२ शासकीय आणि ७५ खासगी अशा ८७ टँकरद्वारे १४३ खेपा करण्यात येत आहेत.


त्याचबरोबर ६६१ खासगी विंधन विहिरी आणि विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या असून त्याद्वारे ६०७ गावांना पाणीपुरवठा सुरू आहे. ४९ गावे टँकरसाठी तर ५५८ गावे टँकर व्यतिरिक्त आहेत. तसेच ४८ विहिरी टँकरसाठी तर ६६१ विहिरीचे टँकरव्यतिरिक्त अधिग्रहण करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details