महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेडात दिव्यांगांच्या मोर्चाने शासकीय कार्यालये दणाणले

नांदेडमध्ये आपल्या विविध मागण्यांसाठी गुरूवारी अंध, दिव्यांगांनी जिल्हा परिषद, महानगर पालिका, जिल्हाधिकारी कार्यालयावर गाढव मोर्चा काढला. या मोर्चाने शहरातील मुख्य प्रशासकीय कार्यालये हादरली होती.

नांदेडात दिव्यांगांच्या मोर्चाने शासकीय कार्यालये दणाणले

By

Published : Jun 28, 2019, 5:26 AM IST

Updated : Jun 28, 2019, 1:26 PM IST

नांदेड - दिव्यांगाचा राखीव निधी खर्च करावा, दिव्यांगांचे बिज भांडवल मंजूर करावे, यासह अन्य मागण्यांसाठी गुरूवारी अंध, दिव्यांगांनी जिल्हा परिषद, महानगर पालिका, जिल्हाधिकारी कार्यालयावर गाढव मोर्चा काढला. दिव्यांगांनी काढलेल्या या मोर्चाने शहरातील मुख्य प्रशासकीय कार्यालये हादरली होती.

नांदेडात दिव्यांगांच्या मोर्चाने शासकीय कार्यालये दणाणले

दिव्यांगांच्या आक्रमक मोर्चाने पोलिसांना घाम फुटल्याचे पहावयास मिळाले. गुरुवारी बेरोजगार दिव्यांग कल्याण कृती संघर्ष समिती, लुईस ब्रेल दि ब्लाईट मेन असोशिएसन या संघटनेच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी गाढव मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अंध, दिव्यांगांसाठी असलेल्या योजनाची अंमलबजावणी करण्यास प्रशासकीय अधिकारी टाळाटाळ करत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. दिव्यांगांच्या या मोर्चाला शहरातील बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासुन सुरूवात करण्यात आली. हा मोर्चा जिल्हा परिषदेवर धडकल्यानंतर दिव्यांगांनी योजनांची अंमलबजावणी होत नसल्याचा निषेध करण्यात आला.

यावेळी जिल्हापरिषद प्रशाासनास शिव्यांची लाखोळी वाहिली. आक्रमक असलेल्या दिव्यांगांना जिल्हा परिषदेच्या प्रवेशव्दारावर अडवल्यानंतर संतापलेल्या दिव्यांगांनी जिल्हापरिषदेचे मुख्य गेट उपसून काढले. त्यानंतर तेथे काही काळ निदर्शने केल्यानंतर दिव्यांगांनी आपला गाढव मोर्चा महानगरपालिकेकडे वळवला. तेथे शहरातील दिव्यांगांना विविध घरकूल योजनेचा लाभ द्यावा, व्यापारासाठी गाळे द्यावेत, स्वंयरोजगारासाठी फुटपाथवर जागा द्यावी अशा विविध मागण्या मान्य कराव्यात अशी घोषणाबाजी करत मनपा विरोधात घोषणाबाजी केली.

त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मुख्य रस्त्यावर रास्ता रोको केला व आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. यात संजय गांधी योजनेचे वाढीव मानधन द्यावे, दिव्यांगांचा राखीव निधी खर्च करावा, अशी मागणी दिव्यांगांनी लावून धरली. दिव्यांगांच्या या मोर्चात राहुल साळवे, नागनाथ कामजळगे, बालाजी आरळीकर, मुंजाजी कावळे, शेख उमर, आनंदा माने, कमलबाई आखाडे, चंद्रकला बहादुरे, सुवर्णा पवार, रंजना लांडगे, सविता तरटे, जयश्री कामजळकर, मनिषा पारधे यांच्यासह असंख्य दिव्यांग बांधव सहभागी झाले होते. दरम्यान, दिव्यांगाच्या या मोर्चाने शहरातील प्रशासकीय कार्यालय दणाणले होते.

Last Updated : Jun 28, 2019, 1:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details