महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Brother Killing In Nanded: मोबाईलमुळे करण-अर्जुनमध्ये वाद; संतापलेल्या करणने अर्जुनला संपविले - लहान भावाचा खून

मोबाईलकरिता एका २३ वर्षीय भावाने त्याच्या २० वर्षीय लहान भावाचा खून केल्याची घटना २५ जून रोजी मध्यरात्री नांदेडच्या सिडको वसाहतीशेजारील गोपाळचावडी येथे उघडकीस आली आहे.

Brother Killing In Nanded
भावाची हत्या

By

Published : Jun 27, 2023, 7:18 PM IST

Updated : Jun 27, 2023, 7:45 PM IST

नांदेड : अर्जुन राजू गवळे याने रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास मोठा भाऊ करण राजू गवळे यास मोबाईल मागितला. मात्र, त्याने नकार दिल्याने दोघा भावांमध्ये वाद झाला. दोघा भावांमध्ये हाणामारी देखील केली. रागाच्या भरात करण याने अर्जुनचा खून केला, असा आरोप मयत अर्जुन गवळे याचे मामा लक्ष्मण मालोजी वाघमारे (रा. सिध्दार्थनगर, नांदेड) यांनी केला. याप्रकरणी आज वाघमारे यांनी तक्रार दिली आहे.


पोलीस घटनास्थळी दाखल: मोबाईलच्या देवाण-घेवाण वरून दोन भावांमध्ये वाद झाला. हा वाद एवढ्या विकोपाला गेला की, मोठ्या भावाने आपल्या छोट्या भावाचाच खून केला. अर्जुन राजू गवळे (२५) असं मृताचे नाव आहे. या घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड व सपोनि. सुरेश थोरात व त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोउपनि. विजय पाटील हे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.



तरुणांईना मोबाईलचे वेड:सध्या मोबाईलचे अनेक तरुणांना वेड लागले आहे. मोबाईलच्या दुष्परिणामाविषयी सोशल मीडियावर संवाद हरवल्याच्या चर्चा नित्यनेमाने केल्या जात असतांनाही तरुण मोबाईल वेडे झाले आहेत. ऑनलाईन गेमसाठी वाटेल ती तयारी असल्याचे हल्लीच्या काळात पहायला मिळते. अनेकांना मोबाईल शिवाय करमत देखील नाही. मोबाईलमुळे वाद देखील होत असल्याचे निदर्शनास येत आहे.

500 रुपयांसाठी भावाचा खून: आईच्या श्राद्धात केलेल्या खर्चात एका मंगल भांडारचे पाचशे रुपये उधारी शिल्लक होती. यावरून उद्‌भवलेल्या वादातून मोठ्या भावाने छोट्या भावाचा काटा काढल्याची धक्कादायक घटना सोलापूर येथील वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. मोठ्या भावाने छोट्या भावास मारहाण करून त्याला ठार केले. ही घटना 28 ऑगस्ट रोजी दक्षिण सोलापूर तालुक्यातील पिंजारवाडी येथे 30 ऑगस्ट, 2022 रोजी घडली आहे.

चौघांना अटक: 30 ऑगस्ट रोजी वळसंग पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. सैफन घूडूसाब नदाफ (वय 41 ,रा पिंजारवाडी,दक्षिण सोलापूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. शहनाझ नदाफ यांनी याबाबत वळसंग पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मीरालाल घुडूसाब नदाफ, सलीम मीरालाल नदाफ, रफिक मीरालाल नदाफ, नियामतबी मीरालाल नदाफ यांना अटक केले आहे. आईचे श्राद्ध करण्यासाठी केलेल्या खर्चावरून फक्त पाचशे रुपयांसाठी मोठ्या भावाने छोट्या भावाचा खून केल्यामुळे सोलापुरात हळहळ व्यक होत आहे.

हेही वाचा:

  1. UP Crime News : पत्नीला हनिमूनला नेण्यासाठी पतीने चोरली बुलेट अन्....
  2. Pune Crime News: पुण्यात दर्शना पवार हत्येची पुनरावृत्ती टळली, एकतर्फी प्रेमातून तरुणीवर केला कोयत्याने हल्ला, पहा सीसीटिव्ही
  3. Thane Crime : लव्ह, सेक्स और धोका: पोलीस असल्याचे भासवून प्रेम; बलात्कार करून पीडितेशी दगाबाजी
Last Updated : Jun 27, 2023, 7:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details