महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने तरुणाचा बुडून मृत्यू; बिलोली तालुक्यातील घटना - बिलोली तालुका

बिलोली तालुक्यातील चिटमोगरा येथे ओढ्याच्या पाण्यात बुडून २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. मारोती शिळे असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे.

बिलोली तालुक्यातील चिटमोगरा येथे ओढ्याच्या पाण्यात बुडून २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.

By

Published : Aug 3, 2019, 6:37 PM IST

Updated : Aug 3, 2019, 7:16 PM IST

नांदेड - बिलोली तालुक्यातील चिटमोगरा येथे ओढ्याच्या पाण्यात बुडून २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. मारोती शिळे असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे.

सततच्या पावसाने चिटमोगरा गावातील ओढ्यात पुराचे पाणी आले होते. मारोतीला ओढा पार करताना खड्ड्यांचा अंदाज आला नाही. त्यामुळे आज (दि.३ ऑगस्ट) रोजी या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

बराच वेळ शोधाशोध केल्यानंतर प्रशासनाला मारोती शिळे याचे प्रेत सापडले. मारोतीच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Last Updated : Aug 3, 2019, 7:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details