महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nanded Road Issues : मृत्यूनंतरही भोगाव्या लागतात इथे यातना; रस्ता नसल्याने गांवकऱ्यांचे हाल, जगदंबा तांड्यावर झोळीतून आणला मृतदेह - मृतदेह झोळी करून गावकऱ्यांनी आणला

नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील जगदंबा तांडा येथील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या गावाला रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून गावकऱ्यांनी आणला आहे.

Nanded Road Issues
झोळीत आणला मृतदेह

By

Published : Aug 9, 2023, 10:27 PM IST

गावकऱ्यांनी मृतदेह झोळीत आणला

नांदेड : जिल्ह्यातील दुर्गम भाग असलेल्या किनवट तालुक्यातील जगदंबा तांडा या वस्तीला जायला रस्ता नसल्याने, गावकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. गावातील संतोष चव्हाण या तरुणाचा सासुरवाडीत मृत्यू झाला. त्यानंतर अंत्यविधी करण्यासाठी संतोषच्या मृतदेहाची झोळी करत गावकऱ्यांनी मृतदेह गावात आणला आहे.

जगदंबा तांडा समस्या : या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या गावाला रस्ता नसल्याने मृतदेहाची होणारी हेळसांड या व्हिडिओमधून उघड होते. किमान आता तरी आम्हाला रस्ता करून द्यावा अशी मागणी जगदंबा तांडा येथील गावकऱ्यांनी केली आहे. अतिदुर्गम भाग असलेल्या किनवट तालुक्याचा विकास झाला नाही. त्यातच्य डोंगराळ भागात जायला रस्ता नाही. आनेकवेळा सत्ता बदल झाले. मात्र जगदंबा तांडा गावाला रस्ता मिळाला नाही. त्यामुळे राजकारणाविषयी येथील नागरिकांमध्ये प्रचंड रोष व्यक्त होत आहे.

विकास नक्की कुठे झाला : एकीकडे भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. तर दुर्गम भागात रस्ते नसताना गावकऱ्यांना झोळी करत मृतदेह न्यावा लागत आहे. किनवट माहूरमध्ये भीमराव केराम हे भाजपचे आमदार आहेत. मागील चार वर्षापासून सत्ता उपभोगत आहेत. किनवट माहूरचा विकास केल्याचा दावा स्थानिक आमदारांनी केला. पण अद्याप जगदंबा तांड्याला जायला रस्ता नसल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे आमदारांचा विकास नक्की कुठे झाला, असा प्रश्न स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.

या आधीही अशीच एक घटना घडली होती :नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील जुनवणेवाडी या आदिवासी वस्तीला जवळच्या गावात जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे सात महिन्यांची गरोदर असलेल्या वनिता भगत या महिलेला प्रसूती वेदना होत असताना, रुग्णालयात जाण्यासाठी चिखलमय रस्त्यावरून अडीच किलोमीटर पायपीट करावी लागली होती. त्यानंतर कुटुंबीयांनी झोळी करत रुग्णालय गाठले होते. मात्र या काळात वेदनांची तीव्रता असह्य झाल्यामुळे उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. अंत्यसंस्कारासाठी तिचे पार्थिव घरी नेण्यासाठीही झोळी करावी लागली होती. राज्यातील दुर्गम भागातील हे वास्तव कधी बदलणार हा खरा प्रश्न आहे.

हेही वाचा -

  1. Pune shocking incident : आयटी हब असलेल्या पुण्यात आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा, महिलेला झोळी करून आणले दवाखान्यात!
  2. Nashik News ब्लँकेटची झोळी करून गर्भवती महिलेला नेलं रुग्णालयात नाशिकमधील मन सुन्न करणारे दृश्य
  3. Nashik Road Issue : झोळीतून दवाखान्यात नेताना गर्भवतीचा मृत्यू, मृतदेह आणतानाही नातेवाईकांची अडीच किलोमीटरची पायपीट

ABOUT THE AUTHOR

...view details