नांदेड -काल सायंकाळी मुसळधार पाऊस झाल्याने ८० महसूल मंडळापैकी २८ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. तसेच या ठिकाणी ६५ मिलीमीटर पेक्षा आधिक पाऊस झाला. या अतिवृष्टीमुळे अनेक शेतीतील सुपीक माती आणि पीके खरडून गेली. गाव शिवारातले नदी, नाले, ओढे पाण्याने आज सकाळीही तुडूंब भरून वाहत आहेत. या पावसामुळे गाव वाड्यातील काही घरांची पडझड झाली आहे.
नांदेड शहरात सर्वाधिक पावसाची नोंद -
गेल्या २४ तासांत सर्वाधिक पाऊस नांदेड शहरात झाला आहे. येथे १४४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्या खालोखाल अर्धापूर महसूल मंडळात १२२ मिलीमीटर पाऊस झाला. तर, धर्माबाद ८५ मिलीमीटर, कापशी ८१ मिलीमीटर, ऊमरी ७४ मिलीमीटर, कलंबर ७२ मिलीमीटर, शेवडी ७२ मिलीमीटर, सोनखेड ७२ मिलीमीटर, कंधार ६३ मिलीमीटर, सिंधी ५६ मिलीमीटर, माळाकोळी ५१ मिलीमीटर, गोळेगाव ५० मिलीमीटर, बिलोली ४२ मिलीमीटर, मुखेड ४१ मिलीमीटर, भोकर ३९ मिलीमीटर, नायगाव ३४ मिलीमीटर, किनवट २८ मिलीमीटर, हिमायतनगर ११ मिलीमीटर, हदगाव ११ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मात्र, माहूर परिसरात पाऊस झाला नाही.