नांदेड -काही दिवसांआधी राज्यातील अनेक देवस्थान, व्यक्तींनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पैसे दिले होते. त्याचप्रमाणे आता अर्धापूर तालुक्यातील दाभड येथील श्री सत्यगणपती देवस्थान देखील मदतीसाठी पुढे सरसावले आहे. देवस्थानच्या प्रशासक मंडळाच्या वतीने कोरोना विरुद्ध लढण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला २५ लाख रुपयांचा धनादेश धर्मदाय आयुक्त यांच्या मार्फत सोपवण्यात आला आहे. देवस्थानच्या या निर्णयाचे भक्त मंडळीकडून देखील स्वागत होत आहे.
आशीर्वादासह मदतीचा हात : नांदेडच्या सत्यगणपती देवस्थानकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २५ लाख रुपये - cm relief fund nanded
कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी सारा देश एकवटला असून अनेकांच्या मदतीचे हात पुढे येत आहेत. काही दिवसांआधी राज्यातील अनेक देवस्थान, व्यक्ती यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पैसे दिले होते.
हेही वाचा...कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी गणपतीपुळे देवस्थान सरसावले, मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केले 11 लाख
अर्धापूर तालुक्यातील श्री सत्यगणपती देवस्थान, दाभड प्रशासक मंडळाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला २५ लाख रुपयांची मदत केली. यावेळी मदतीचा धनादेश धर्मादाय आयुक्त किशोर मसने, निरक्षक डि. के. पठान यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. त्यावेळी श्री सत्यगणपती देवस्थानचे प्रशासक मंडळाचे कर्मचारी नारायण पाटील, जगन्नाथ साखरे आदी उपस्थित होते. कोरोना ससंर्ग आटोक्यात आणण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नाची पराकाष्ठा करत आहेत. यासाठी सर्वच स्तरातून मदतीचा ओघ सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर अर्धापूर तालुक्यातील श्री सत्यगणपती देवस्थानने प्रशासक मंडळाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत केली आहे.