नांदेड - जिल्हयातील किनवट तालुक्यात काल (गुरुवारी) सायंकाळी गारपीट झाली होती. किनवट तालुक्यातील बोधडी, सावरी या गावाच्या परिसरात रात्री जोरदार पावसासह गारपीट झाली. आधीच दुष्काळामुळे शेतकरी अडचणीत सापडला असताना या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
किनवट तालुक्यात गारपिटीमुळे गहू, हरभरा, हळद पिकांचे नुकसान
गारपिटीमुळे बोधडी सावरी गावच्या परिसरातील गहू, हरभरा आणि हळदीचे प्रचंड नुकसान झाले आहे. सुमारे अर्धा तास ही गारपीट सुरू होती. गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून, यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
नांदेडमध्ये गारपीटमुळे झालेले पिकांचे नुकसान
रात्री झालेल्या गारपिटीमुळे बोधडी सावरी गावच्या परिसरातील गहू, हरभरा आणि हळदीचे प्रचंड नुकसान झाले आहे. सुमारे अर्धा तास ही गारपीट सुरू होती. गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून, यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. हे जवळपास १०० ते २०० ग्राम वजनाच्या या गारा होत्या.