महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 4, 2020, 8:53 PM IST

ETV Bharat / state

काळजी नसावी; नांदेडमधील कोरोना रुग्णांचा रिपोर्ट नेगेटिव्ह...!

विष्णुपुरी परिसरात कोरोनाचा संशयित रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. या संशयित रुग्णाला नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर त्याच्या थुंकीचे व रक्ताचे नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थानच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले.

corona in nanded
विष्णुपुरी परिसरात कोरोनाचा संशयित रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली होती.

नांदेड- विष्णुपुरी परिसरात कोरोनाचा संशयित रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. या संशयित रुग्णाला नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर त्याच्या थुंकीचे व रक्ताचे नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थानच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. संबंधित नमुने तातडीने तपासणीसाठी घेण्यात आले. विषाणु संस्थेने दिलेल्या अहवालात हे नमुने निगेटीव्ह असल्याचे समोर आले आहे.

पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थानाचा अहवाल

प्रादुर्भाव झाल्याची शक्यता वर्तवण्यात येणारा हा तरुण मागील वर्षापासून सौदी अरेबियातील बहरेन येथील एका कंपनीत होता. एक मार्चला तो हैद्राबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता. यानंतर नांदेड आल्यावर त्याला ताप, थंडी, खोकल्याचा त्रास सुरू झाला. यानंतर दोन मार्चला त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच त्याचा रक्ताचे व थुंकीचे नमुने पुण्याला पाठवण्यात आले होते. आता हे नमुने निगेटीव्ह असल्याचे समोर आले असून त्याची प्रकृती स्थिर आहे.

दरम्यान, सौदी अरेबियातील बहरेन येथे 40 रुग्ण कोरोना बाधित आढळले आहेत. संबंधित रुग्ण देखील याच देशातून आल्याने त्याला संशयित म्हणून कोरोना वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. संबंधित तरुणावर कोरोनाचा संशयित रुग्ण म्हणून उपचार करण्यात येत होते. मात्र, निगेटीव्ह अहवालामुळे नांदेडकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details