नांदेड - जिल्ह्यात रविवार (आज ) प्राप्त झालेल्या ४ हजार ६७३ अहवालापैकी ९२७ अहवाल कोरोना बाधित आले आहे. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे ४०१ तर अँटिजेन तपासणीद्वारे ५२६ अहवाल बाधित आले आहे. आता जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या ३१ हजार ७१६ एवढी झाली आहे. तर ९ जणांचा मृत्यू झाला आहे.
रविवारी नऊ जणांचा मृत्यू
नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा उच्चांक कायम, रविवारी ९२७ नवे रुग्ण - कोरोना लेटेस्ट न्युज नांदेड
जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या काही कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. शिवाय मृत्यूचा दरही वाढत असल्याचे पुढे आले आहे. रविवारी नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत्त रुग्णांची संख्या ६४८ एवढी झाली आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या काही कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. शिवाय मृत्यूचा दरही वाढत असल्याचे पुढे आले आहे. रविवारी नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत्त रुग्णांची संख्या ६४८ एवढी झाली आहे.
४ हजार ६७३ अहवालापैकी ३ हजार ६१६ अहवाल निगेटिव्ह
४ हजार ६७३ अहवालापैकी ३ हजार ६१६ अहवाल निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या आता ३१ हजार ७१६ एवढी झाली असून यातील २५ हजार ४६३ बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकूण ५ हजार ३७७ बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील ५९ बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.
हेही वाचा-रविवारी राज्यात तब्बल 30 हजार 535 कोरोनाबाधितांची नोंद, 99 जणांचा मृत्यू