नांदेड- दररोजच कोरोना रुग्ण वाढीचा उचांक कायम आहे. जिल्ह्यात शुक्रवारी (आज) प्राप्त झालेल्या ३ हजार १२६ अहवालापैकी ६९७ अहवाल कोरोना बाधित आले आहे. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे ४०५ तर अँटिजेन तपासणीद्वारे २९२ अहवाल बाधित आले आहेत. आता जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या २९ हजार ८४२ एवढी झाली आहे. तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
गुरुवार १८ मार्च २०२१ शिवाजीनगर मालेगाव रोड नांदेड येथील ५७ वर्षाच्या एका पुरुषाचा, स्वामी विवेकानंद नांदेड येथील ५७ वर्षाच्या एक महिलेचा, सिडको नांदेड येथील ५९ वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णूपुरी नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर शुक्रवार १९ मार्च २०२१ रोजी लोहा येथील ५५ वर्षाच्या एका पुरुषाचा व मालेगाव रोड नांदेड येथील ५० वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत्त रुग्णांची संख्या ६३२ एवढी झाली आहे. एकूण ३ हजार १२६ अहवालापैकी २ हजार २९५ अहवाल निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या आता २९ हजार ८४२ एवढी झाली आहे. तर यातील २४ हजार ८१४ बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकूण ४ हजार १७० बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु आहे. यातील ५१ बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.
नांदेड जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढीचा उचांक कायम - नांदेड कोरोना बातमी
शुक्रवार १९ मार्च २०२१ रोजी लोहा येथील ५५ वर्षाच्या एका पुरुषाचा व मालेगाव रोड नांदेड येथील ५० वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत्त रुग्णांची संख्या ६३२ एवढी झाली आहे.
नांदेड हाॅस्पीटल