नांदेड - जिल्ह्यात सोमवार (आज) प्राप्त झालेल्या ५ हजार ६१ अहवालापैकी १ हजार २९१ अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे ७७१ तर अँटिजेन तपासणीद्वारे ५२० अहवाल बाधित आले आहेत. आता जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या ३३ हजार ७ एवढी झाली आहे. तर दहा जणांचा मृत्यू झाला आहे.
ही आहे कोरोना मृत्त रुग्णांची संख्या
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे चैतन्यनगर नांदेड येथील ५४ वर्षाची एक महिला, शिवाजीनगर नांदेड येथील ५३ वर्षाचा पुरुष, अंबानगर येथील ७० वर्षाची एक महिला, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे राजनगर नांदेड येथील ६४ वर्षाचा पुरुष, नांदेड येथील ७० वर्षाचा पुरुष, भाग्यनगर येथील ४७ वर्षाची माहिला, खाजगी रुग्णालयात सोमेश कॉलनी येथील ९० वर्षाचा पुरुष, शिवाजीनगर येथील ५० वर्षाचा पुरुष, चैतन्यनगर येथील ६८ वर्षाचा पुरुष आणि नांदेड येथील ८० वर्षाच्या एका महिलेचा समावेश आहे. हे मृत्यू दिनांक २० ते २२ मार्च २०२१ या कालावधीत झाले आहेत. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत्त रुग्णांची संख्या आता ६५८ एवढी झाली आहे.
ही आहे जिल्ह्यात एकूण कोरोना बाधितांची संख्या
आजच्या ५ हजार ६१ अहवालापैकी ३ हजार ३९० अहवाल निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या आता ३३ हजार ७ एवढी झाली आहे. यातील २५ हजार ८५५ बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकूण ६ हजार २६४ बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील ५९ बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.
इतक्या बाधितांवर सुरु आहे औषधोपचार
जिल्ह्यात ६ हजार २६४ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे १८८, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड ८०, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) ९९, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड १५, किनवट कोविड रुग्णालयात ७६, मुखेड कोविड रुग्णालय १२५, देगलूर कोविड रुग्णालय १९, हदगाव कोविड रुग्णालय ४३, लोहा कोविड रुग्णालय १३०, कंधार कोविड केअर सेंटर २०, माडवी कोविड केअर सेंटर ७, बारड कोविड केअर सेंटर ४, महसूल कोविड केअर सेंटर १०२, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण ४ हजार १३२, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण १ हजार ११२, तर खाजगी रुग्णालयात ३७५ रुग्णांवर औषधोपचार सुरु आहे.
नांदेडमध्ये कोरोनाचा उद्रेक सुरुच; एकाच दिवशी १ हजार २९१ नवे कोरोना बाधित - नांदेड कोरोना उद्रेक सुरुच बातमी
आजच्या ५ हजार ६१ अहवालापैकी ३ हजार ३९० अहवाल निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या आता ३३ हजार ७ एवढी झाली आहे. यातील २५ हजार ८५५ बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.
नांदेड कोरोना