नांदेड - मराठवाड्यातील अनेक भागात २ ते ८ ऑगस्टदरम्यान मुसळधार पावसाची शक्यता मुंबईच्या हवामान खात्याने वर्तविली आहे. या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांना सतर्क राहण्याचा इशारा दिला गेला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ८४३.२५ मिमी पाऊस झाला आहे.
मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा, नांदेड जिल्ह्यात संततधार सुरू
मराठवाड्यात २ ऑगस्टपासून पावसाला सुरुवात झाली आहे. श्रावण सरी दमदारपणे बरसत असून, पावसाची संततधार सुरूच आहे. चांगल्या पावसामुळे बळीराजाच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे.
continuous rainfall in nanded heavy rainfall expected in marathwada
दरम्यान, मराठवाड्यात २ ऑगस्टपासून पावसाला सुरुवात झाली आहे. श्रावण सरी दमदारपणे बरसत असून, पावसाची संततधार सुरूच आहे. चांगल्या पावसामुळे बळीराजाच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे. यावर्षी पहिल्यांदाच शेतीच्या बाहेर पाणी निघाले असून नदी-नाल्यांना थोड्या प्रमाणात का होईना, पाणी वाहत आहे. माहूर, हिमायतनगर, हदगाव तालुक्यात मुसळधार पावसासह अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यात मात्र अजून मोठा पाऊस बरसावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.