महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या सभेला लोक जमविण्याच्या कारणावरून पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची - Vinod Patil

भोकर येथील माजी नगराध्यक्ष विनोद पाटील चिंचाळकर आणि माजी नगरसेवक मकसुद गोंदवाले यांच्यात लोक जमविण्याच्या कारणावरून बाचाबाची झाली.

पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची

By

Published : Apr 15, 2019, 6:39 AM IST

Updated : Apr 15, 2019, 7:47 AM IST

नांदेड - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे नांदेड लोकसभा मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची भोकर येथे शनिवारी सभा होती. त्यापूर्वी सभेला लोक जमविण्याच्या कारणावरून काँग्रेसच्या दोन पदाधिकाऱ्यांत बाचाबाची झाली. व्यासपीठावरच हा सर्व प्रकार घडल्याने काही काळ गोंधळ उडाला होता.

भोकर येथील माजी नगराध्यक्ष विनोद पाटील चिंचाळकर आणि माजी नगरसेवक मकसुद गोंदवाले यांच्यात लोक जमविण्याच्या कारणावरून बाचाबाची झाली. हे पाहताच कार्यकर्त्यांनी तात्काळ मध्यस्थी केल्याने पुढील वाद टळला.

पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची


निवडणूक असताना सभेच्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांमध्ये आपआपसात भांडण झाले आहे. याप्रकाराने काँग्रेसचा हक्काचा मतदारसंघ असलेल्या भोकर काँग्रेसमधील गटबाजी समोर आली आहे. येणारा काळ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासाठी अवघड परिस्थिती निर्माण करते की काय अशी चर्चा सुरू आहे.

Last Updated : Apr 15, 2019, 7:47 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details