नांदेड -शेतकऱ्यांच्या दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी गुरूवारी (दि. ३ डिसेंबर) काँग्रेसच्या वतीने अर्धापूर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने लादलेल्या कृषी कायद्याविरोधात देशभरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप असून या कायद्याविरोधात शेतकरी एकवटला आहे. हा जाचक कायदा रद्द करावा, या मागणीसाठी शेतकरी दिल्लीत पोहोचला असून मागण्या मान्य होईपर्यंत ते मागे हटणार नाहीत.
शेतकरी आंदोलन : अर्धापूर, कंधारमध्ये काँग्रेसचे धरणे आंदोलन
केंद्र सरकारने लादलेल्या कृषी कायद्याविरोधात देशभरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप असून या कायद्याविरोधात शेतकरी एकवटला आहे. हा जाचक कायदा रद्द करावा, या मागणीसाठी शेतकरी दिल्लीत पोहोचला असून मागण्या मान्य होईपर्यंत ते मागे हटणार नाहीत.
सरकारकडून अद्याप सकारात्मक प्रतिसाद नाही
मागील चार-पाच दिवसांपासून देशभरातील शेतकरी संघटनांच्यावतीने दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करण्यात येत आहे. मात्र अद्यापही केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या मागणीबाबत सकारात्मक निर्णय न घेतल्याने शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी प्रदेश काँग्रेसच्या आदेशानुसार पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या सूचनेनुसार काँग्रेसच्यावतीने अर्धापूर व कंधार तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीसांसह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी सहभागी झाले.