नांदेड- भरधाव चारचाकीच्या धडकेत पाच वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी नांदेड-किनवट राज्यमार्गावर रास्तारोको केला आहे. घटनास्थळी हिमायतनगरचे पोलीस निरीक्षक दाखल झाले असून गावकऱ्यांची समजूत काढून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न करत आहेत.
अर्पिता सीताराम गुंडेकर (वय 5 वर्षे), असे मृत चिमुकलीचे नाव आहे. ही घटना आज सकाळी 11:30 च्या सुमारास हिमायतनगर तालुक्यातील सरसम गावाजवळ घडली आहे. अर्पिता ही चिमुकली अंगणवाडीतून आपल्या घराकडे निघाली होती. त्याच वेळी भरधाव चारचाकीने तिला जोरदार धडक दिली. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला.
हेही वाचा -तलवारीने हल्ला करत लुटले सोने, नांदेडला येत होते मित्र-मैत्रीण
या अपघातानातर चारचाकीचालकाने घटनास्थळावरून चारचाकी घेऊन पळ काढला आहे. घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या चिमुकलीला बघून संतप्त गावकरी रस्त्यावर उतरले. त्यानंतर नांदेड-किनवट राज्यमार्ग अडवत आंदोलन सुरू केलं आहे. अपघात केलेल्या चालकाला आणि चारचाकीच्या मालकाला तात्काळ अटक करून गुन्हे दाखल करण्याची मागणी लावून धरली आहे. नांदेड किनवट मार्गावरील वाहतूक तब्बल तीन तासांपासून रोखून धरल्याने या मार्गावर वाहनांची मोठी रांग लागली आहे.
हेही वाचा - जिल्हा परिषदेत चारही सभापती काँग्रेसचेच; राष्ट्रवादीच्या हाती भोपळा....!