महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लोहा-कंधारमध्ये शिवसेनेला उमेदवारी; मात्र चिखलीकरांचे समर्थक निवडणूक लढविण्यावर ठाम

भाजप-शिवसेना महायुतीने राज्यातील काही विधानसभेचे उमेदवार जाहीर केले आहेत. तर, नांदेड जिल्ह्यातील चर्चेत असलेल्या लोहा-कंधार मतदारसंघात शिवसेनेकडून अ‍ॅड. मुक्तेश्वर धोंडगे यांना उमेदवारी दिली आहे. धोंडगे यांना उमेदवारी जाहीर करताच लोहा-कंधार मतदारसंघात चिखलीकर समर्थकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे.

लोहा-कंधार मतदार संघात शिवसेनेचा उमेदवार जाहीर होताच चिखलीकर समर्थक अस्वस्थ

By

Published : Oct 2, 2019, 12:04 PM IST

नांदेड - लोहा-कंधार विधानसभेसाठी भाजप-सेना महायुतीने मुक्तेश्वर धोंडगे यांना उमेदवारी जाहीर केल्याने चिखलीकर समर्थकांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. यामुळे चिखलीकर समर्थकांनी चिखलीकर मित्रमंडळाच्या नावाने लोहा-कंधार मतदारसंघासह नांदेड दक्षिण मतदारसंघात निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे. या अनुषंगाने मंगळवारी चिखलीकर यांच्या निवासस्थानी चिखलीकर मित्रमंडळाची बैठक घेण्यात आली. या मित्रमंडळाने चिखलीकर यांना ३ ऑक्टोबरपर्यंत आपला निर्णय जाहीर करण्याची डेडलाईन दिली आहे.

लोहा-कंधार मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार जाहीर होताच चिखलीकर समर्थक अस्वस्थ


भाजप-शिवसेना महायुतीने राज्यातील काही विधानसभेचे उमेदवार जाहीर केले आहेत. तर, नांदेड जिल्ह्यातील चर्चेत असलेल्या लोहा-कंधार मतदारसंघात शिवसेनेकडून अ‍ॅड. मुक्तेश्वर धोंडगे यांना उमेदवारी दिली आहे. मुक्तेश्वर धोंडगे यांना एबी फार्म देखील दिला आहे. शिवसेनेने मुक्तेश्वर धोंडगे यांना उमेदवारी जाहीर करताच लोहा-कंधार मतदारसंघात चिखलीकर समर्थकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे.

हेही वाचा - नांदेडमधील १० गावांचा आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार
मंगळवारी चिखलीकर समर्थक तथा चिखलीकर मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या निवासस्थानी बैठक घेतली. यात लोहा-कंधार मतदारसंघातून प्रवीण पाटील चिखलीकर यांनी निवडणूक लढविण्याची परवानगी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना मागितली. यावेळी भाजप महानगराध्यक्ष दिलीप कंदकुरते प्रदेश कार्यकारिणी सदस्य चैतन्यबापू देशमुख, मित्रमंडळाचे अध्यक्ष सुरेश राठोड, प्रवक्ते प्रल्हाद उमाटे, चित्राताई गोरे, प्रवीण पाटील चिखलीकर, नरेंद्र गायकवाड यांच्यासह अनेकांची उपस्थिति होती.

हेही वाचा - विधानसभा निवडणूक 2019 : खा.चिखलीकरांना दे धक्का... होमपीचवरची उमेदवारी शिवसेनेच्या वाट्याला..!
यावेळी लोहा-कंधार मतदारसंघातून प्रवीण पाटील चिखलीकर यांना तर, नांदेड दक्षिण मतदारसंघातून प्रणिताताई देवरे यांना निवडणूक लढविण्याची परवानगी देण्याचा आग्रह मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी चिखलीकर यांच्याकडे केला. येत्या २ दिवसात या संदर्भाने निर्णय द्यावा, अशी मागणीही त्यांनी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याकडे केली. यावेळी बोलताना खासदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला निर्णय मान्य आहे. जिवंत असेपर्यंत भारतीय जनता पार्टीत राहणार असा शब्द मी त्यांना दिलेला असल्याने आता मी मागे हटणार नाही. लोहा-कंधार मतदारसंघातून प्रवीण पाटील चिखलीकर यांना उमेदवारी द्यावी, असा आग्रह जनतेचा आहे. यासंबंधाने मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन उमेदवारीच्या बाबतीत बदल होईल का याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. परंतू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे सांगतील ते मान्य असल्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा - रणधुमाळी विधानसभेची : अशोक चव्हाणांचा उमेदवारी अर्ज दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details