नांदेड - सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यभरातील मराठा बांधव आक्रमक झाले आहेत. नांदेडमध्ये छावा संघटनेने पालकमंत्री मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या बंगल्यासमोर ढोल वाजवा आंदोलन सुरू केलंय. छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब जावळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले असून छावाचे शेकडो कार्यकर्ते चव्हाण यांच्या बंगल्यासमोर ठिय्या आंदोलन करत आहेत.
नांदेड : अशोक चव्हाणांच्या घरासमोर 'छावा'चे ढोल वाजवा आंदोलन
नांदेडमध्ये छावा संघटनेने पालकमंत्री मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या बंगल्यासमोर ढोल वाजवा आंदोलन सुरू केले आहे.
प्रचंड घोषणाबाजी आणि ढोल वाजवत हे आंदोलन करण्यात येत असून पोलिसांनी या परिसराला अक्षरक्ष छावणीचे स्वरूप दिले आहे. मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे. दरम्यान बंगल्याच्या काही अंतरावर पोलिसांनी आंदोलन कर्त्यांना थांबवले असून पोलिसांनी आम्हाला हात लावला तर आंदोलनाला उग्र स्वरूप प्राप्त होईल, असा इशारा छावाच्या कार्यकर्त्यांनी दिला.
या ठिकाणी तणाव निर्माण झाला असून पोलीस मध्यस्ती करत आहेत. मराठा आरक्षण उप समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी जाब द्यावा, असे संघटनेचे म्हणणे आहे