महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेड : तरुणीच्या हत्येप्रकरणी प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल - Nanded crime news

शनिवारपासून (दि. 20 जून) बेपत्ता असलेल्या तरुणीचा मृतदेह सोमवारी (दि. 22 जून) एका शेतात सापडला. या मृतदेहाचे लचके कुत्रे तोडत होते. ही बाबा लक्षात येताच सरपंचांनी पोलिसांना माहिती दिली. तरुणीच्या चपला व कपड्यांवरून तिची ओळख पटली. याबाबत तिच्या प्रियकराविरोधात मरखेल पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

police station
मरखेल पोलीस ठाणे

By

Published : Jun 24, 2020, 10:39 AM IST

Updated : Jun 24, 2020, 11:46 AM IST

देगलूर (नांदेड) - तालुक्यातील धनगरवाडी येथील एका तरुणीचा खून केल्याप्रकरणी तिच्या प्रियकराविरुद्ध भरत गायकवाड याच्याविरुद्ध मरखेल पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. 23 जून) खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, धनगरवाडी येथील तरुणी शनिवारी (दि. 20 जून) घरातून बेपत्ता झाली होती. या तरुणीच्या नातेवाइकांनी सर्वत्र शोध घेतला तरी, ती सापडली नाही. सोमवारी (दि. 22 जून) सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास महादेव मलबा सूर्यवंशी यांच्या गायरान शेतात कुत्रा लचके तोडीत असलेला अज्ञात मृतदेह लोणीचे सरपंच हनुमंत पाटील यांना दिसला. त्यांनी याबाबत मरखेल पोलीस ठाण्यात माहिती दिली. लचके तोडलेले अर्धवट शरीर, पायातील चपला, कपडे यावरून नातेवाइकांना तरुणीची ओळख पटली. गावालगत राहत असलेला भरत गायकवाड आणि या तरुणीला शनिवारी गावातीलच व्यंकट पाटील हातराळे यांनी एकत्र पाहिल्याचे सांगण्यात येत आहे.

भरतने आपल्या मुलीचा खून केल्याची फिर्याद तिच्या आईने मंगळवारी दिली. या फिर्यादीवरून भरत गायकवाड याच्याविरुद्ध मरखेल पोलीस ठाण्यात भा.दं.वि.चे कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा -बिलोली तालुक्यातील प्रेमीयुगुलाची मन्याड नदीत उडी घेऊन आत्महत्या

Last Updated : Jun 24, 2020, 11:46 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details