नांदेड- विवाह ठरलेल्या वधूवर विवाहापूर्वीच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना देगलूर येथे घडली आहे. २ एकर शेती आणि २ लाख रुपये नावावर करुन दे, अशी अट नवरा आणि तिच्या कुटुंबियांनी वधूकडे केली होती.
लग्नापूर्वीच नियोजित वधूवर अत्याचार; ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल - nanded
लग्नाची तारीख जवळ येताच २ एकर शेती नावावर आणि २ लाख रुपयांची मागणी केली. वर आणि वराकडील मंडळींनी आपली फसवणूक केल्याचे लक्षात येताच पीडित नववधुने पोलीस ठाणे गाठून पोलिसांना सर्व हकिकत सांगितली.
देगलूर तालुक्यातील या मुलीचा विवाह तेलंगणातील बोधन तालुक्यातील युवकाशी ५ मे रोजी होणार होता. विवाहासाठी सर्व तयारी देखील करण्यात आली होती. लग्नाची संपूर्ण तयारी झाली असताना वराने नियोजित वधुचा विश्वास संपादन करुन तिच्यावर लग्नापूर्वीच अत्याचार केला. एवढेच नाही तर लग्नाची तारीख जवळ येताच २ एकर शेती नावावर आणि २ लाख रुपयांची मागणी केली. वर आणि वराकडील मंडळींनी आपली फसवणूक केल्याचे लक्षात येताच पीडित नववधुने पोलीस ठाणे गाठून पोलिसांना सर्व हकिकत सांगितली.
नववधूने देगलूर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन नियोजित वर, ३ महिलांसह एकूण ६ जणांविरुद्ध अत्याचार, फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते करीत आहेत.