महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Brother Kills For Property : संपत्तीच्या वादातून सख्ख्या चुलत भावाचा खून

नांदेड - शहरातील गाडीपुरा भागात एका प्लॉटच्या वादातून चुलत भावाने ( Cousin ) आपल्या चुलत भावास चाकूने भोसकून खून केला. ही घटना शुक्रवारी (17 जून) सायंकाळी साडेचारच्या सुमारास गाडीपुरा भागातील एक खांबा दर्गासमोर घडली. श्यामसिंह प्रकाशसिंह परमार (वय 45) असे मृताचे नाव आहे. नांदेड पोलिस ( Nanded Police ) या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

Murder of cousin
चुलत भावाचा खून

By

Published : Jun 18, 2022, 5:31 PM IST

नांदेड - शहरातील गाडीपुरा भागात एका प्लॉटच्या वादातून चुलत भावाने ( Cousin ) आपल्या चुलत भावास चाकूने भोसकून खून केला. ही घटना शुक्रवारी (17 जून) सायंकाळी साडेचारच्या सुमारास गाडीपुरा भागातील एक खांबा दर्गासमोर घडली. श्यामसिंह प्रकाशसिंह परमार (वय 45) असे मृताचे नाव आहे. नांदेड पोलिस ( Nanded Police ) या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

संपत्तीचा होता वाद - नांदेड शहरातील गाडीपुरा येथे राहणारा मनोजसिंह राजेंद्रसिंह परमार ( वय 35) आणि त्याचा चुलत भाऊ श्यामसिंह प्रकाशसिंह परमार (वय 45) यांचे मागील काही दिवसांपासून सामायिक संपत्तीतून वाद होत होता. त्यांचे अनेकवेळा किरकोळ भांडणेही झाली होती. अखेर शुक्रवारी मनोज परमार याने श्यामसिंह परमार याचा चाकूने भोसकून खून केला. विशेष म्हणजे मनोजसिंह परमार हा रक्तरंजित चाकू घेऊन इतवारा पोलिस ठाण्यात हजर झाला. माझ्या चुलत भावाचा खून करून आलोय, असे त्याने म्हणताच पोलीसांनाही धक्का बसला. पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांनी त्याला ताब्यात घेतले.

उपचारापूर्वीच मिळण्यापूर्वीच झाला मृत्यू -घटनेची माहिती मिळताचउपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे, पोलीस निरीक्षक भगवान धबडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. एस. मुत्तेपोड, फौजदार असद शेख यांनी घटनास्थळ गाठले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या श्यामसिंह परमार याला शासकीय रुग्णालय विष्णुपुरी येथे दाखल केले, परंतु उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी इतवारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

हेही वाचा -Sanjay Raut on Agnipath scheme : गुलामांना ठेकेदारी पद्धतीवर कामावर घेतलं जाऊ शकतं, सैनिकांना नाही! - संजय राऊत

ABOUT THE AUTHOR

...view details