नांदेड - लग्नात हुंडा कमी दिल्याच्या कारणावरून आणि दिसायला सुंदर नाही, असे म्हणत २२ वर्षीय विवाहितेचा छळ केल्याने तिचा आकस्मिक मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. सिडकोच्या वाघाळा परिसरातील शाहूनगरमध्ये ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सासरच्या मंडळींविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
सासरच्यांनी छळ केल्याने विवाहितेचा मृत्यू; गुन्हा दाखल - nanded
लग्नात हुंडा कमी दिल्याच्या कारणावरून आणि दिसायला सुंदर नाही, असे म्हणत २२ वर्षीय विवाहितेचा छळ केल्याने तिचा आकस्मिक मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
विवाहिता दिसायला चांगली नाही, तिला घरात नीट वागता येत नाही, तिच्या नातेवाईकांनी कमी हुंडा दिला या कारणास्तव सासरच्या मंडळींनी तिचा मानसिक व शारीरिक छळ केला. या छळामुळे तिचा आकस्मिक मृत्यू झाला.
याबाबत प्रकाश चित्ते (रा. किवळा लोहा, नांदेड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामीण पोलिसांनी विवाहितेचा पती रामदास गायगोधणे, सासू शांताबाई, नणंद उषा कदम, नंदवाई सुभाष कदम, जळबा महादेव, राम महादू, सुनीता रमेश यांच्याविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.